गावातील इतर मंदिरे व सण: |
|
देवीभोयरे येथे अनेक मंदिरे आहेत व अनेक प्रकारचे उत्सव वर्षभरात साजरे होतात. भाद्रपद महिन्यानंतर अश्विन एकादशीला नवरात्र बसते. हा इथला सर्वात मोठा व महत्वाचा उत्साव असतो. बाकीचे वर्षभरातील उत्सव पुढीलप्रमाणे |
1) |
श्रावणातल्या सर्व मंगळवारी देवीची यात्रा असते. |
2) |
चैत्र महिन्यातही देवीची यात्रा असते. या यात्रेला गोसावी जमातीचे भक्त लोक खूप मोठया प्रमाणावर येतात. |
3) |
आषाढ महिन्यात तिस-या मंगळवारी देवीला अभिषेक असतो व गावचा सामुहिक देवी भंडारा असतो. |
4) |
महाशिवरात्रीला महादेवाची यात्रा असते. |
5) |
चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्रात पालखी व यात्रा असते (मार्गशीर्ष शु. यष्ठी) यात मुख्यत बेलोटे, गायकवाड परिवार सामील होतो. |
6) |
चैत्र कृ. तृतियेला जेजुरीला खंडोबाच्या यात्रेसाठी देवी भोयरे ग्रामस्थ व बारभाई, सर्व बलुतेदार जातात. |
7) |
हनूमान जयंती, रामनवमी, गोकुळ अष्टमी, दत्तजयंती इत्यादी सण भजन, किर्तन, पोथी, आरती करुन साजरे होतात. |
8) |
फाल्गुन महिन्यात पंचमीला अखंड हरिनाम सप्ताह असतो. नामवंत कीर्तनकार येऊन विठठल रखुमाईचे कीर्तन करतात. |
9) |
कार्तिक द्वादशीला गोसावीबाबांचा भंडारा असतो. |
10) |
गुडीपाडवा, आठयापूजन, पंचांग वाचन तसेच रणधुमाळी (सोंगे) हा पारंपारिक सण मोठया उत्साहात, रात्री साजरा होतो. यात हिरण्य कश्यपू, प्रल्हाद, राम रावण युध्द नाटकरुपाने पारंपारिक पध्दतीने सादर केले जाते. |
11) |
कार्तिक शु. पौणिमेला (त्रिपुरारी पौर्णिमा) चारंगबाबा यात्रा साजरी होते. |
12) |
इतर सामाजिक सण, उदा. होळी, रंगपचमी, संक्रात, बैलपोळा तसेच राष्टीय सण स्वातंत्र्यदिन, शिवजयंती, आंबेडकर जयंती सामुहिक साजरे होतात. |
|
देवीभोयरे येथे महादेव मंदिर, मुंजोबा मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबाची दोन मंदिरे, विठठलरखुमाई मंदिर, कै. श्री. शं. दे. क्षीरसागर यांचे वडीलबंधू कै. श्री. रघुनाथ क्षीरसागर यांची समाधी अशी अनेक मंदिरे आहेत. |
तसेच देवीभोय-याच्या आजूबाजूला ही अनेक प्रसिध्द मंदिरे आहेत. उदा. निघोज मळगंगादेवीचे जागृत देवस्थान, शिरसुले खंडोबा, वडगाव भैरवनाथ, पाडळी दर्याबाई, पिंपळगाव रोठा कोराणा खंडोबा, र्चोभूत मोक्काई देवी, लोणीमावळा भैरवनाथ, बाभुळवाडे केदारेश्र्वर येथे ही अनेक भक्त येतात व त्या त्या देवांचे उत्सव साजरे होतात. यात्रा भरतात. |
|
|
|
|
|
|
|
|