सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भाग 1 ला भक्‍ति‍सौष्‍ठव
(चाल-भो प्रभो विभो)
जय शुभंकरे सुखाकरे गुणसरिते । तव पदीं सुखा मन वरिते ।। जय० ।।
तव मूर्ति मनोहर अंबे । शोभसी किती जगदंबे
कमलासनिं बैठक शोभे । भयभव अवघे हरिते ।। जय० ।।१।।
आयुधें करी तव खाशीं । पुरविती मनोरथ राशी ।
श्रीपदयुग हें मज काशी । तव अ‍घटीत हीं चरितें ।। जय० ।।२।।
विनवितों तुला मी माये । करि कृपा अम्‍हां शिवजाये
मानसीं सदा तूं राहें । मग मज नलगे परतें ।। जय०।।३।।
शंकरा तुझा हा छंद । निशिदिनीं करो आनंद
प्रार्थि‍तों तुला मतिमंद । हर मम अवघी दुरितें ।। जय० ।।४।।
-----------------------
(चाल-स्‍वार्थी। प्रीति मनुजाची सहज ती)
गानीं । गावुं जगदंबा स्वामिनी ।। गानीं०।।१।।
अष्‍टभुजा ती सुंदर मूर्ति । आणूं या ध्‍यानी ।। गानीं०।।१।।
निखिल चराचर व्‍यापुनि उरली । ही चैतन्य खनी।। गानीं०।।२।।
तत्‍पदिं किंकर विनवी शंकर । नाम वसो वदनीं ।। गानीं०।।३।।
-----------------------
(चाल सुरेख संगम किती । सखेग सुरेख संगम किती)
आनं‍दि अंबाबाई सखेग आनंदि अंबाबाई ।।
देवि भोयरे गांवी पाही सखेग । आनंदि अंबाबाई ।। ध्रु०।।
स्‍थळ निवांत हें भूवरी ।स्‍थळ ।। किती आनंद देते तरी ।।किति।।
कलियुगांत साक्ष पुरी सखेग आनंदि अंबाबाई ।।१।।
नव विलास मूर्ति पहा । नव०।। किति सुरेख दिसते अहा। किति०।।
अष्टभुजांत आयुधे महा सखेग आनंदि अंबाबाई।।२।।
चौतिसात श्रावण मासी । चौति०।। अष्टमीच्‍या पुण्‍यदिशीं ।। अष्‍ट ०।।
झाली स्‍थापन मूर्ति खाशी सखेग आनंदि अंबाबाई ।।३।।
पुरवितेहि मन कामना । पुर०।। रोग हरोनि देइ सुतधना । रोग ।।०।।
अति आनंद वाटे मना सखेग आनंदि अंबाबाई ।।४।।
आठा दिवसा मंगळवारी । आठा०।। यात्रा वा‍हते नानापरी । यात्रा।।
गुळ शेरणि वाटे भारी सखेग आनंदि अंबाबाई ।।५।।
नवरात्रांत उत्‍सव अती । नव। अष्‍टमीस होम होती ।। अष्ट ०।।
गांवोगांवीच्‍या दिंडया येती सखेग आनंदि अंबाबाई ।।६।।
जरि असेल गांठी पुण्‍य । जरि०।। तरि घडेल हें दर्शन ।। तरि ० ।।
पाप जाईल संहारून सखेग । आनंदि अंबाबाई ।।७।।
खेडेगांवांत वस्‍ती केली । खेडे ०।। परि जगात कीर्ति झाली । परि ०।।
शंकरा प्रचीती आली सखेग आनंदि अंबाबाई ।।८।।
-----------------------
( चाल जाऊ जाऊ दे )
जाऊ जाऊ या आनंदे पाहुं अंबिका ही । पाहुं अंबिका ही ।। जाऊ ०।।
अष्‍ट भुजा किति मूर्ति सुंदर पा‍हुनि‍ तन्‍मय होऊ क्षणभर
सार्थक करुं या नेत्राचे मग लागुं पायीं मग० ।। जाऊ।।1।।
तन मन धन करुं तत्‍पदि अर्पण । विसरुनि जाऊ मग मी तूं मी तूं पण
शंकर सादर भवभयहारक नाम गायीं अंबेचे नाम गायीं ।। जाउं ।।
-----------------------
(चाल सुंदर तें ध्‍यान )
सुंदर तें ध्यान शोभे कमळावरी । अष्टभुजा धरी मनोहर ।।
म‍‍कर कुंडले तळ‍पती श्रवणीं । आयुधभूषणी विराजित ।।
गळां पुष्‍पहार सर्वांगीं संभार । आवडे निरंतर हेंचि ध्‍यान ।।
सौभाग्‍यानंदाचे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमूख आवडीनें ।।
दास म्‍हणे हेचि सुख नित्‍य देई । मागणे तें कांहीं नसे दूजें ।।
-----------------------
(चाल मानवा तूं घेई)
ही नवमूर्ति अष्‍टा‍करधारी ।।
प्रेमभरें हर्ष भरे सुविचारें नयनिंहि पाहुं ध्‍याऊ सुखकारी ।।
अष्‍ट भुजा शिवभाजा मनिं माझया राहुनि तारि तारि संसारीं ।।
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved