सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
राग-हंसध्‍वनी ताल नाट‍‍की त्रिताल
ध्यास लागला मला निरंतर
भेटवा अंबि‍का माउली
कल्पवतरुची साउली मला
भेटवा अंबि‍का माउली ।। धृ० ।।
स्थान स्वयंभू देविभोयरे
माहुरगटची मूर्त अवतरे
धर्ममयीश्ववर सिं‍ह रूप रे
मूर्ता स्थामपन केली ।।१।।
अष्टचभुजांकि‍त रुप ती कमलासन
घंटा हल शर चाप सुदर्शन
शंख शुल भुसलादि घेउन
हसतमुखाने आली ।।२।।
सोनसळीचा शालु भर्जरी
हिरवी चोळी काठ केशरी
किरिट कुंडल रत्नांघकित करि
गोठवाकी पाटली ।।३।।
बिंदी बिजवरा मोती पोवळी
कर्ण भुषणे नयनी झळाली
हळदि कुंकूम केशर भाळी
कस्तुरी काजळ डोळी ।।४।।
मोहनमाळा ठुशी गळसरी
साज तन्मणी पुतळया हारी
पायी जोडवी पैंजण नुपुरी
रत्‍न मेखला ल्याली ।।५।।
जाई जुई शेवंती मोगरे
झेंडु चाफा भरले हारे
माळा गुंफू करुया गजरे
वाडी फुलांची केली ।।६।।
मांडा रंगित पाट चंदनी
ताट चांदीचे रांगुळी रेखुनि
पुरणपोळीही किती निगुतीनी
पक्वाने बहु केली ।।७।।
केले तांबुल तबक सजवले
खण भर्जरीचे चुंडे अणविले
ओटी नारळ अहेव लेणी
प्रेमे अर्पण केली ।।८।।
धूप सुगंधी दीप उजळुनी
करू आरती स्तवने गाउली
भावभक्तिच्या स्तुतीपाठांनी
आनंदी अंबा झाली ।।९।।
प्रसन्न होता अंबा प्रेमळ
रुप पहाता मन हो निर्मळ
दॄढतर होई भावभक्ति बळ
वॄत्ती सात्विक झाली।।१०।।
तुला पुजावे ध्यावे गावे
नामस्मरणी रंगुनि जावे
यज्ञयागीतव नित्या रमावे
इच्छा मी बहु केली ।।११।।
हीच आस गे मम अं‍तरिची
आवड लागो तव चरणांची
पुण्याई मम तव चरणांची
आज फळाला आली ।।१२।।
 
राग-खमाज ताल नाटकी त्रिताल चाल मी मज हरपुनि बसले ग!
जय जगदंब दयाधन देवी, करुणाकारी तूं पावे
धवल तुझं यश आनंदाने, रात्रदिन मी गावे
व्यवसायाच्या नित्याववर्ति, पुरता मी हा फसलो
सुख दुखाच्याय दुर्गम संभ्रमी, घडि घडि मी सापडलो
अनुसंघाने तुझ्याच अंबे, नित्य सुखी मी झालो
अपुनि ओंजळ सुख दु:खाची, मी तव चरणी रमलो
कितिदा अंबे तुवा रक्षिले, असता मी संकटी
अतराई तव कसा होउ मी, प्रेममये शेवटी
तु माता मम, बालक मी तव, सांभळि निजभावे
हेच मागणे तव चरणांना, कधी न मी विसरावे
करिता पूजन कृतज्ञतेने, रंगुनिया मी जावे
धवल तुझ यश शुध्द मनाने, दिनरात्री मी गावे
राग-मिश्र मांड ताल दादराचाल -घडि घडि घडि चरण तुझे आठविते राया
उदयोडस्तु जगदंबे जगदीश्वरी अंबे
करुणाकरी कमलेश्वमरी ये तू अविलंबे
जय दुर्गे सर्वेश्वरी मुळी न मज विसंबे
सन्निध मम राहि सदा जय जय जगदंबे ।।१।।
 
उदय तुझा होता मनि तुजसी मी पहावे
घडि घडि तव स्ममरणी मी रंगुनिया जावे
अर्चनि वा किर्तनी वा भजनि मी रमावे
जगदंबे सन्निध मम नित्य तू असावे ।।२।।
 
अशनि शयनि स्व्प्नि मनी छंदि तव असावे
नामस्मयरणात तुझे दर्शन मज व्हावे
सर्वव्या‍पी रूप तुझे मज प्रतीत व्हावे
जगदंबे सन्निध मम नित्ये तू असावे ।।३।।
 
रात्रदिन ध्यास तुझी घडो चरणसेवा
विसर तुझ्या चरणांचा मज कधी न व्हावा
रंगुनि रंगात तुझया विऊनी मी नुरावे
जगदंबे सन्निध मम नित्यी तू असावे ।।४।।
 
माय बाप बंधू आप्त सखे सोयरे ये
बंधने तुझीचे तूच तोडी आदिमाये
सर्व स्थळी रूप तुझे स्वामिनी पहावे
जगदंबे सन्नि‍‍ध मम नित्यद तू असावे ।।५।।
 
तु माया आदिशक्ति श्री मा उमा गे
तु अनदि तुन न अंत विश्व्माउली गे
तू धात्री तू कर्ति भवतारक व्‍‍हावे
देवूनि पदि ठाव मजसी आत्मरूप द्यावे
जगदंबे सन्निध तव नित्य मी असावे
जगदंबे सन्निध मम नित्य तू असावे ।।६।।
 
रंगरेखा रेखुनी मी भावरेखा रेखिते
अंतरी तव रूप अंबे नाम वदनी राहु दे
सर्वकाळी नामगानी नामगोडी जोडी दे ।।धॄ।।
 
छंद नामाला जडावा भावभक्ति दृढ करी
होउ दे व्‍यवहार सारे, तू वसावे अंतरी
सर्वसाक्षी अंबिके मज, चुकुनि मजसि चुकू न दे
सर्वकाळी नामगानी नामगोडी जोडी दे ।।१।।
 
दे कुणा अधिकार कोणा राज्‍य दे धनसंपदा
संतती, सुख, सौख्‍य, शांति, मोक्ष, मुक्ति दे पदा
मजसि दे परी वास चरणी, स्‍मरण अंति होउ दे
सर्वकाळी नामगानी नामगोडी जोडी दे ।।२।।
 
मज न ठावे स्‍तवन पुजन कवण  रिति तव करु?
ज्ञान ना मज भाव भक्ति मी तुझे परि लेकरु
स्‍वामिनी तू मम कुळाची, कणव तुजला येउ दे
सर्व‍काळी नामगानी नामगोडी जोडी दे।।३।।
 
तुजासी जैसे योग्‍य वाटे, ठेवि मजला तू तसे
मी न मागो तुजसि काही, न्‍यून मम तुज कळतसे
अंतरी ओंसडुनि मम, शांती तॄप्‍ती वाहू दे
सर्व‍‍काळी नामगानी नामगोडी जोडी दे ।।४।।
 
माझिया मनिचे मनोगत, तुजसि ठावे अंबिके
मम हिताहित तुजसि कळते, रक्षि मज जगदंबिके
दे पदि मज ठाव माते, अंबिके करूणास्‍पदे
सर्वकाळी नामगानी नामगोडी जोडी दे ।।५।।
 
 
   
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved