सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
पंचामृति अभिषेक श्रीवरि भल्‍या पहाटे केला
पंचामृति अभिषेक श्रीवरि भल्‍या पहाटे केला
यथासांग षोडषोपचारे पुजियले अंबेला
विविध परीचि फुले हार सप्रेमे अर्पण केले
धूपदीप नवैद्य दक्षिणा फल तांबुल हि दिधले
पंचारति ओवाळुनि घालु वारा मयुर पिसांनी
घंटेच्‍या तालावर आरति करू या एक सुरांनी
सबळ झांजा घंटानदि दुमहुमले मंदिर
मूर्तिमंत जणु भक्ति अवतरे घेऊनि विविधाकार
कर्पूराती घेऊनि घ्या हो चरणतीर्थ अंबेचे
प्रदक्षिणा लोटांगण घालुनि चरणि शरण व्‍हासाचे
स्‍तुति स्‍तवणे म्‍हणुया भावे शुध्‍दमनानी
भक्तिभाव पाहुनी प्रकटावि जगजननी
क्षणभरि विसरु प्रपंच तो व्‍यवहार
नामस्‍मरणि तल्लिन होता घडु दे साक्षात्‍कार
“उदयोगस्‍तु“ ने सुरू करावि आरति जगदंबेची
ज्ञानोदय हो तिच्‍या कपेने तीच माय जगताची
नवरात्रि जरि घडेल यापरि सेवा जगदंबेची
तुझी काळजि तिला, तुला नच चिंता भवतापाची
अगणित भक्‍ता आजवरि हा अनुभव असाच
सख्‍या मन्‍मना! दढभक्तिने वश कर जगदंबेस ।
 
जगंदब माऊलि मज दिसली स्‍वप्‍नात
जगंदब माऊलि मज दिसली स्‍वप्‍नात
ते रुप मनो‍हर ठसले मम हदयात ।।
 
प्रेम‍मयि-करूणा-लावण्‍याची पुतळी
सर्वांगि भूषण झळकत दिव्‍य झळाकी
शिरी किरीट कुंडले कस्‍तुरी कुंकम भाळी
आयुधे तळपति अष्‍टभुजाकमलात
ते रुप मनोहर ठसले मम हदयात ।।
 
भर्जरी बुध्‍दीचा शालु हिरवागार
केशरि कंचुकी विलसत नक्षीदार
कटि रत्‍नमेखला हिरण्‍मय हार कंठी
शुभ सुर्वण पैंजण रुणझुणति चरणात
ते रुप मनो‍हर ठसले मम हदयात ।।
 
ती सुहास्‍यवदना तेज नयनि रविशशिचे
वात्‍सल्‍य-प्रेम-लावण्‍य अखिल विश्‍वाचे
मी पाहियले हो रुप विश्‍वमाऊलिचे
पुलकित हो तनुही, प्रेमाश्रु नयनात
ते रुप मनो‍हर उसले मम हदयात ।।
 
जागृति मला ये, गेले स्‍वप्‍न विरोनि
परिचित्र चिंतनि चित्ति दिसे तें अजुनि
जगदंब दयाघन! दे दर्शन मज फिरुनि
स्‍वप्‍नात दिले तरि - मानिन सौख्‍य तयात
ते रुप मनो‍हर ठसले मम हदयात ।।
 
तुज आवड लागो अंबा पदकमलाची
तुज आवड लागो अंबा पदकमलाची
चित्‍तात चिंतनि मूर्त वसो अंबेची ।
 
कमलासनि बसली एक मांडि घालून
आयुधे विविध ती आठ करी घेऊन
निजभक्‍ता रक्षि माय जननी होऊन
ती प्रसन्‍नवदना पुतळी सत्‍वगुणाची
चित्‍तात चिंतनि मूर्ती वसो अंबेची ।।
 
व्‍यवहार चालू दे रोज तुझे नित्‍याचे
परि मनात चालवि चिंतन जगदंबेचे
मग कशास भय तुज माया भवतापाचे?
आच‍रणि उमटावी ग्‍वाही शुध्‍द मनाची
चित्‍तात चिंतनि मूर्ती वसो अंबेची ।।
 
आनंद जगातील तुजसाठीच निर्मियला
संतोष सेऊनि कृतज्ञ हो अंबेला
पाहुणा म्‍हणोनि त्‍या जगती तूं आला
जाणीव ठेव तूं नित्‍य तुझया जाण्‍याची
चित्‍तात चिंतनि मूर्ती वसो अंबेची ।।
 
ती अनंतरुप अनंत नामें तिजसी
ती अलिप्‍त राहुन चालविते विश्‍वाची
श्री रमा उमा जी अंतयमि निवासी
ही विष्‍णुमाया शक्‍ती असे साबांची
चित्‍तात चिंतनि मूर्ती वसो अंबेची ।।
 
जगदंब नित्‍य माझया
जगदंब नित्‍य माझ्या
सन्‍नि‍ध तूं असावे
स्‍मरणात चिंतनी वा
चित्‍तत तूं वसावे।
 
व्‍यवहार रोजचे मम
घडती तसे घडू दे
चित्‍तात मात्र जप तव
त्‍या खंड नच पडू दे ।
 
दु:खात वा सुरवात
मज ठेव तूं कसे ही
सानिध्‍य तव असावे
हदयात तूच राही ।
 
मज छंद लागला तव
लागे तुझाच ध्‍यास
तव चरणी विनवणी ही
दे चरण कमली वास ।
 
 
 
 
 
 
 
   
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved