आवड नसे मनात |
आवड नसे मनात |
कसे मग येईल नाव मुखात? |
|
जन्मा आला प्रभु विसरला |
मायाजाली बुडून गेला |
घाव्याचा जणुबैलच झाला |
स्मरण न करिसी ज्यानी तुजला धाडिले जगति |
आवड नसे मनात, कसे मग येईल नाव मुखात |
|
बालपणा जणु विरुन गेला |
तरुणापणा तो आला, सरला |
प्रौढपणी बलहीन जाहला |
प्रपंचओढा कमी न जाहला आसक्तीच मनात |
आवड नसे मनात कसे मग येईल नाव मुखात |
|
आपत्काळी स्मरण प्रभुपदा |
विसरुनि गेला सरता विपदा |
पुन्हा सुरु मी पणा संपदा |
यातच गेला पार गुंतुनि विषय सदा चित्तात |
आवड नसे मनात, कसे मग येईल नाव मुखात |
|
अजून नाहि सरली वेळ |
स्मरण करी तो आहे प्रेमळ |
प्रभुपद सेवा होवो तवबल |
आवड होता सवड होईल स्मरणशील प्रभु चित्त |
उपजे गोडी मनात, सहज ये नाव नित्य चित्त |
|
दोन मनांचा झगडा चालु सदैव निजांतरात |
दोन मनांचा झगडा चालु सदैव निजांतरात |
वादविवादाची या चाहुल कधी न इतरा येत |
एक मन असे सदवृत्तिचे वृत्ति असत ती दुजाची |
न्याय देवता असे आंधळी ''बुदधि'' म्हणवि जी साची |
असत वृत्तीचे सदैव म्हणणे “पाप पुण्य” हे झुट |
आहे तोवर मजा करावी खाउनिया भरपेट |
कसली आली नीतिबंधने? देवधर्म थोतांड'' |
सदवत्ति परि सांग “ज्याने निर्मियले ब्रम्हांड |
परमात्मा तो भरूनि राहि बघ अवघ्या विश्वात! |
आनंदाने रहा जगी परि गुंतू नको तूं यात |
कृतज्ञतेने स्मरण करी जी हदयातरि तव वास करी |
सर्वसाक्षी जी विष्णुमाया जगदंबेचे स्मरण करी |
कृती तुझी तुज सलते नंतर तेच असे रे पाप |
पुण्यकर्म जे सुखवि इतरा स्वत:स जरि हो ताप |
प्राप्त तुला नरजन्म जाहला जगदंबेला जवळ करी |
नामें गेले पर्वत तरुनि प्रभु नामा ते वास करी” |
एकुनि म्हणणे हया दोघांचे बुध्दि विचारी थिटी पडू |
बुध्दिला ना कळला कधीच ईश म्हणुनि ती चांच पडे |
निकष बुध्दिचा जिथे संपतो भाव तिथे तो सहज |
भावानंतर भक्ती तेथे भगवंतासह ये अनुसरे |
भक्तीसाठी आसन लागे ममताळु मन हदयाचे |
प्रेम उपजता वाद संपति हदयि उदय हो अंबेचे |