सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
मंदिराचे व्यवस्थापन:
रोज सकाळ, संध्याकाळ, सूर्यादय व सूर्यास्ताचे वेळी यथासांग देवीची पूजा होते. पूजा करण्यायसाठी गुरव वंशपरंपरा आहे, त्यांची दोन घरे आहेत. ते आलटून पालटून वर्षभर निगुतीने पुजा करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरवांचे साल बदलते. देवीपुढे जे धान्य., पैसे, ओटी, साडी, खण, नारळ, गूळ, पेढे, तेल तूप इत्यादी येते ते सर्व त्यांचेच असते. देऊळवाडा, मंदिर, गाभारा स्वच्छ ठेवणे हे सर्व गुरवच करतात. रोजचा धूप, दीप, नैवेद्य, फुले, बेल, हार वगैरे पूजेचे साहित्य हेही गुरवांचेच असते. गावातल्या भक्तांच्या मळयांत आलेली फूले, उदा. झेंडू, चाफा, अस्टर, जाई जुई इत्यादीचे हार, वेण्या बनवणे व वाहणे हे ही काम गुरवच करतात.
नवरात्रात लांबून दर्शनाला अनेक लोक येतात, सारखी यात्रा चालूच असते, मंगळवार, शुक्रवार, पंचमी, अष्‍टमी, नवमी, पौर्णिमा या दिवशी खूप लांबलांबून भक्त येतात. त्यांनी आणलेले हार वगैरे सायंपूजेला अगर प्रात:पूजेला वापरता येतात. फुले वाहिल्यानंतर देवी अत्यंत विलोभनीय दिसते. देवीच्याय सगुण रुपाला तसेच निर्गुण तांदळयाला नऊवारी पातळ (साडी) नेसवतात. गुरव अत्यंत छान प्रकारे देवीला नटवतात, सजवतात. त्यामूळे येणारा यात्रेकरू पुढीलवेळी आणखी मित्रमंडळी, आप्तासह येतात व देवीची किर्ती वाढते. देवी नवसाला पावते हा अनेकांचा अनुभव आहे. तो कर्णोपकर्णी भक्त सांगतात. त्या‍मुळे आपोआपच नवीन येणा-या भक्त मंडळीमध्‍ये वाढ होते.
भक्‍तांचे का‍ही प्रश्‍न असतात, त्‍याचे उत्‍तर मिळविण्‍यासाठी ते देवीला कौल लावतात. गुरव निर्गुण मूर्तीला कौल लावतात. सकाळी व संध्‍याकाळी आरतीचे पूर्वी पूजा झाल्‍यानंतर उजव्‍या व डाव्‍या बाजूला चंदनाच्‍या गंधावर चाफयाचे अ‍थवा झेंडू, शेवंतीचे फूल चिकटवतात व ते फूल आरतीच्‍या वेळात उजव्‍या बाजूस पडले तर काम होणार, डाव्‍या बाजूस पडले तर काम होणार ना‍ही व फूल न पडल्‍यास संदिग्‍ध समजतात. हे फक्‍त फूल ज्‍याने लावले त्‍यालाच समजते. प्रश्‍न उघड करावा लागत ना‍ही. तो गुप्‍तच रा‍हतो. साधारणत मंगळवार, शुक्रवार व रविवार असा कौल लावतात व त्‍याची प्रचितीही भक्‍तांस येते असा अनुभव आहे.
वाजंत्री वाजवणारे गोंधळी दररोज आरतीच्या वेळी सेवा सादर करतात, ती विनामूल्य असते. गोंधळ घालायचा असला तर त्यां भक्ताने सर्व सामान दिल्यावर नवरात्रांत तो घालतात. हे गोंधळी पण पिढीजात आहेत. ते गावात फेरी करून जे मिळेल त्यावर गूजराण करतात. आरतीच्या वेळी संबळ, टाळ, झांजा वाजंत्री व शिवाय घंटानादही असतो.
 
 
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved