सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भाग 3 रा , नि‍वेदन
श्‍लोक
वाटे मला त्‍वरित लाभ अमूप व्‍हावा
जेणे समस्‍त ऋणभार लयास जावा ।
येईल जैं तव मना जगदंब ऐसें
होईल सिध्‍द अवघे अकृत प्रयासें ।।१।।
 
आ‍‍हे मला भरवंसा दृढ हा जरी ‍‍कीं
वाटे न धीर मन चंचल हें विलो‍की।।
तेणें उतविळपणा घडतो सदाही
हा दोष सर्व मम घालवि तूंच पाही ।।२।।
 
प्रातव्‍य जें मम असेल मिळेल खास
त्‍यालागिं कांही करणें नलगे प्रयास ।
हें सर्व निश्चित तरी छळतेच आस
मा‍ते तिचा करि जगज्‍जननी निरास ।।३।।
 
माझें मनोगत तुला अवघेंच ठावें
माझ्या मुखें तुजपुढें मग कां वदावें ।
माझें हिताहित तुलाचि कळें समस्‍त
माते करी तुज गमेल जसें प्रशस्‍त ।।४।।
 
मी अज्ञ बालक तुझें जननी मदीय
तूं सर्वथा तुजवीणें मज न स्‍वकीय ।
तूं काळजी निशिदिनीं धरितेस माझी
राखी मला सतत गे जगदंब राजी ।।५।।
 
जें जें मना मज गमे कथितों तुला तें
तूं माय मी शीशु तुझा सुखवी मुलातें ।
माते तुला मजमुळें जरि होय कष्‍ट
प्रेमार्द्र तूं म्‍हणुनि होसि कधीं न रुष्‍ट ।।६।।
 
माझ्याकडोनि न घडे तव कांहि सेवा
तूं नित्‍यशुध्‍द असशी करीशी न हेवा
वात्‍सल्‍य थोर तुलना न तयास कांहीं
मभ्‍द्राग्‍य थोर गमते जननी मला ही ।।७।।
 
मी थोर पूर्व सुकुतें पदरी तुझ्या गे
आलों जगज्‍जननि सारि तया न मागें ।
वेडा खुळा परि तुझा सुत मी म्‍हणोनी
राखी मला न करि दुर असा गणोनी ।।८।।
 
हें प्रार्थनाष्‍टक तुझ्या चरणीं अनन्‍य
भावें समर्पुनि तुझा म्‍हणवीन धन्‍य।
माते जगज्‍जननि पूर्ण कटाक्षीं
ठेवूनि तूं मजसि हें जगदंब रक्षी ।।९।।
 
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved