सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भाग 3 रा , नि‍वेदन
श्‍लोक
जी जी परिस्थीती घडे समयानुसार
ती सर्व संमत तुला न दुजा विचार।
त्‍यांतील सर्व सुख दुख तुझें म्‍हणोनी
स्‍वीकारितों जननि मी हृदयीं गणोनी ।।१।।
 
जें जें स्‍थलांतर मला घडलें घडेल
तें सूत्र चालन तुझ्या पदरी जडेल
हेतू विशिष्‍ट नुमजे तव माय आधीं
माझें अजाणपण हें मज नित्‍य बाधीं ।।२।।
 
अंती सुखावह घडेल जसें मला कीं
तें तेच तूं घडवीशी मज लागीं लोकीं ।
त्‍यांतील दुख सुख जें मज भासतें तें
माते मदल्‍पमतिला न कळोनि येते ।।३।।
 
तूं दूरदर्शि जननी तुज कां कळेना
मी अल्‍पबुध्दि मजला मन आकळेना ।
तात्‍कालिक क्षणसुखा वश होय चित्‍त
त्‍या इष्‍ट तें घडविण्‍या करि यत्‍न नित्‍य ।।४।।
 
तात्‍काळ जें सुख न तें सुख सर्व‍काळीं
तैसेचं दुख न गमे स्थिर अन्‍य वेळीं ।
जें भासतेंच सुख दुख मनास सारे
त्‍या कालचक्र फिरवी वि‍वि‍ध प्रकारें ।।५।।
 
माझे मनास न कळे सुखदुख कांहीं
तें कांक्षितें सुखचि केवळ नित्‍य पाही ।
वाटे तया सतत इष्‍ट तसें घडावें
जें त्‍या अनिष्‍टें न तसे पदरीं पडावें ।।६।।
 
माझें हिताहित खरें मजला कळेना
हें चित्‍त चंचल सदा मज आकळेना ।
माते तुझ्यावरि असे मम भार सारा
ठेवी मला तव गमेल जसे विचारा ।।७।।
 
मी हीन दीन परि बाळक की तुझा गे
प्रेमार्द्र तूं जननि सारि तया न मागे।
इच्‍छा तुझी सतत मी शिरसा नमोनी
वागेन निर्भय असा वर दे भवानी ।।८।।
 
माते तुझ्यावीण रिता न कुठेंच ठाव
सर्वस्‍थळीं विलसतो तव सुप्रभाव ।
तूं नित्‍य संनि‍ध म्‍‍हणोनि न भी कदा मी
तेणेंच सर्व गमतें मज नित्‍य नामी ।।९।।
 
त्‍वत्‍सूत्र चालन सलील घडे तयातें
पाहूं कृतज्ञ मतिनें स्थीरचित्त माते
ठेवूं तुझें स्‍मरण नित्‍य हृदंतराळीं
राहूं तुझ्यांत अशि दे मति सर्वकाळीं ।।१०।।
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved