|
भगवान शंकर आणि पार्वती हे दांपत्य शिव व शक्ति या नावाने ओळखले जाते. पार्वती ही हिमालयाची कन्या म्ह्णूणुन तिला हिमनगनंदिनी म्हणतात. तिच्याग प्रथम अवताराला सती हे नाव आहे. सतीने दक्ष प्रजापतीच्याद पोटी जन्मत घेतला तिने महादेवाला मनोमन वरिले, हे दक्षाला, तिच्याय पित्याला आवडले नाही. कारण महादेवाजवळ ना पैसा, ना घरदार. स्मशानवासी शंकराचे वाहन नंदी, त्याचे गण म्हणजे भूत, प्रेत, पीशाच्च गण. निवासाचा ठाव ठिकाण नाही. भोळे शंकर कुणावरही प्रसन्ना होउन त्याची मागणी मान्य करणारे. गळयात सर्पालंकार, व्याघ्रांबर परीधान करणारे, सदा स्वानंदात मग्नय असणारे विरक्ता योगीश्वर, ऐहिक सुखाबददल अनासक्त अशा शंकराला दक्षाने जो यज्ञ केला त्या यज्ञाला येण्याबद्दल मुददामच आमंत्रण दिले नाही. वास्तविक ब्रम्हा, विष्णु, महेश या त्रयीशिवाय हा विश्व पसारा चालणे अशक्य, म्हंणुन महादेव यांना वगळणे योग्य नव्हते. उत्पत्ती, स्थिती व लय हे त्रयीचे काम, त्यामुळेच हा ब्रम्हांडगोल व्यवस्थित काम करतो हे दक्ष प्रजापती कसे विसरला हे सर्व हेतुपुरसर केले गेले. |
इकडे यज्ञ सुरु होताच शंकरांनी (शंकर म्हणजे मूर्तीमंत ज्ञानाचेच रूप) सतीचे अचेतन शरीर खांद्यावर घेतले व ते भ्रमण करु लागले. हे श्री विष्णुंना वावगे वाटल्यावरुन त्यांनी ते सतीचे कलेवर घेतले व सुदर्शन चक्राने त्याचे तुकडे तुकडे करुन सर्व भूतलावर फेकले. जिथे जिथे हे अवशेष्ा पडले तिथे तिथे देवीची शक्तिपीठे निर्माण झाली. त्यातील साडेतीन पीठे जी दक्षिणेत महाराष्टात निर्माण झाली. ती माहूर (रेणुकामाता), कोल्हापुर (महालक्ष्मी्) व तूळजापुर (भवानीमाता) ही तीन पूर्ण पीठे व अर्धमात्रा पीठ वणीचे (सप्त,श्रृंगी). या ठिकाणी शिवशक्ति एकरुप आहेत. |
सात्विक, राजस व तामस अशी ही त्रिगुणात्मक देवी अनुक्रमे माहूरगड, कोल्हापूर व तुळजापूरला महासरस्वाती, महालक्ष्मी व महाकली रुपात प्रसिध्द् झाली व अर्धमात्रास्थितानित्या यानुच्चा्रा विशेषतः अशी शिवशक्तीर गडावरची देवी म्हणुन वणीला प्रसिध्द् आहे. ही महाशक्तिपीठे कशी निर्माण झाली या संबधीची ही पाश्रर्वभूमी . |