सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भाग 2 ला संसारसार
(चाल लंबोदर गिरिजानंदना)
मन गुरुचरना रत जाहलें । भक्तिसुधारसि नाहलें ।। मन ०।।१।।
गाढाज्ञान तमोलय होउनि । ज्ञानरुप जगिं राहिलें ।। मन ०।।२।।
भक्तिरसीं दॄढ गुंतुनि जातां । मी तूं पण हें वाहिलें ।। मन ०।।३।।
गुरुदैवत हा भेद न उरला । दोन्‍हीं एकचि पाहिलें ।। मन ०।।४।।
सद्रुचरणा नाहीं तुलना । परिसाहुनि तें आगळे ।। मन ०।।५।।
-----------------------
(चाल किती कपटी अससि तूं)
करि सद्रुरुचरण स्‍मरणा । नतजल भव संकट‍हरणा ।। ध्रु०।।
जगंदबापदकमळीं षटपद । करवी अंतकरणा ।। करि ०।।१।।
जगदंबा गुरु भिन्‍न न असती । एकचि समज तयांना ।। करि ०।।२।।
-----------------------
(चाल धाडुनी दीधले दासीसह ०)
दूर मी झालो भवपाशाच्‍या जाळीं सांपडुनी ।
वैराग्‍यें या सद्रुरुराया भेटविलें फिरुनी ।
धन्‍य जगीं या जगदंबेची भक्ति खरी सुखदा ।
जीव शिवाची भेटी घडवी चढवी दिव्‍यपदा ।
संसारी या भक्‍ती एकचि जीवानंद सदा ।
भवभय हरते ज्ञान स्‍फुरते नुरवी मोहमदा ।
गुरुराया मी होउं कैसा उतराई अपुला ।
अर्पितसें हें मस्‍तक चरणीं धावे अभय मला ।। दुर ०।।
 
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved