भाग 2 ला संसारसार |
|
|
१ |
(चाल धाडुनि दिधले दासी) |
क्षणभरि येई वीट मनाला विषयी रत होतां । |
वैराग्याचा अंकुर उपजे मनुजाच्या चित्ता । |
सार न काही वाटे तेव्हा विष्यांच्या ठायीं । |
स्तब्ध्पणा हा भोगक्लेशें ठाकतसे हृदयीं । |
अंतकरणीं उमीं उठते वैराग्याची ही ।।१।। |
----------------------- |
२ |
(चाल भूपती खरे ते वैभव) |
हा व्याप नको संताप वाढवी भारी |
राहुनी मिळेना सुख गृहसुत परिवारीं । |
संसार नको हा कष्ट फार तो देई । |
तें बरें राहणें फटिंग होउनि पाही । |
एकटया जिवाचा त्रास पडे तो काय । |
वन बरें नको घर कष्ट सोसिना देह ।। |
वन बरें नको घर कष्ट सोसिना देह ।। |
(चाल) म्हणतील आप्त ते काय मज तरी |
हा संसाराला भ्याला बहुपरी। |
नेभळा खुळा हा झाला कां तरी |
अभिमान उठे हा काय करावें आतां |
न सुचे मज कांही सौख्य कसें ये हाता । |
----------------------- |
३ |
(चाल निर्धनतेनें लज्जा उपजे) |
वैराग्याने प्रकाश पडतो मनुजाच्या अंतरीं । येई विचार तो क्षणभरी ।।१।। |
सार असारा निवडायाची बुध्दी उपजे बरी । बुडतां नित्य मोहसागरीं ।।२।। |
सदबुध्दीनें सुविचाराचा उदय होय अंतरीं । ऐसी परंपरा ही खरी ।।३।। |
|