सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भाग 2 ला संसारसार
 
(चाल फुलें सुवासिक हीं)
आनंद स्‍थळ तें जीवा । आनंद स्‍थळ तें । सुखदुख संभ्रमीं
मोहुनि जाता कोठे नच मिळतें ।। आनंद ।।ध्रु०।।
   या मानवदेही संसाराचा ठेवा । धनपुत्रगेहिनी गृहकीर्तीच्‍या हांवा ।
निजकर्तृत्‍वाचा अहंभाव मिरवावा । यांतचि निजबळ तें वेंची यां‍तचि ०।।
वासना ओढिती जशा तसें ते । चंचल मन पळतें ।।आ०।।१।।
सव्दिवेक उपजा वैराग्‍याने राहो । या नश्र्वर लोकीं सार काय तें पाहो ।
दृढ यत्‍न व्‍दारें भक्ति समागम पावो ।  जीवित सत्‍फळ तें यां‍तचि जीवित ०।।
का व्‍यर्थ असारी संसारी मन राहुनि तळमळते ।। आ०।।२।।
-----------------------
(चाल दों दिवसाची तनु हे साची)
क्षणात हसती क्षणात रडती क्षणांत चढती गर्वगिरी
क्षणात बुडती मोहसागरीं विचित्र लीला किती तरी ।।१।।
कन‍क कामिनी ध्‍येय ठेउनी अगाध यत्‍नीं तळमळती
गृहासंमानी गुंग होउनी सैरावैरा किती पळती ।।२।।
मानासाठी अपमानाची जोड साधिती कुणी किती
सौख्‍य मिळाया यातायाती कोणी रात्रदिन करिता ।।३।।
कैसें हाले सूत्र आपुलें खेळ खेळवी ऐसे कां
कोण आपणा न धरी कोणी ऐशा सुविवेका ।।४।।
-----------------------
(चाल तें म्‍यां ब्रहम पाहिलें)
हीं कळसूत्री बाहुलीं । हीं कळसूत्री बाहुलीं
निजरंगीं किति दंग होउनी । मीपणिं सारा करिति पसारा
कशि पडलीं त्‍यां भुली । हीं कळ ०।।१।।
भोग न चुकता प्रारब्‍धाचे । निजकर्माच्‍या परिपाकाचे
फेरे घेती सुखदुखाचे । परि ममता बाणली ।। ही कळ०।।२।।
अहंपणाचा ताठा धरुनी । बावरती हीं सर्वाचरणीं
यांतें न गमे शास्‍ता कोणी । कशि माया बिंबली ।। हीं कळ ०।।३।।
-----------------------
(चाल कामदा )
कर्मबीज तें नष्‍ट होइना । सौख्‍यदुख तें ये क्षणक्षणा
केवि होय आनंद या जिवा । भक्ति वांचुनी नित्‍य तो नवा ।।१।।
-----------------------
(चाल साकी )
सदबुध्‍दीनें विवेक उपजी वैराग्‍ये बळ पावो
भक्ति सहायें सदुरूदर्शन होउनि कृतार्थ होवो
अंबापद भक्‍ती । जीवा आनंद प्राती ।।१।।
-----------------------
(चाल त्‍यजि भ‍क्‍ती साठी लाज)
किती सुंदर हा संसार मनिं फार बिंबुनि राही ।। ध्रु०।।
संपत्ति मनोरम कांता । नवमंदिर सुखसाधनता
बहु दासदासि सुतदुहिता । परिवार हा किती देई ।। किती ०।।
आमुच्‍या सुखास्‍तव सारा । हा जगतीं सर्व पसारा
अनियंत्रित या अधिकारी । हा चढवी सकळा पाही ।। किती ०।।
-----------------------
(चाल किति वानुं बळ युवतीचें )
संसार या जगिं केवळ येई नरदेहीं उदया ।। येई नर ०।।
पशुपक्ष्‍यादिक हीन बापुडे कैंचें ज्ञान तया
संसारी जरि सारीं। गढणारी । दिसति खरी
निजदेहधर्मा अनुसरुनी तीं आस्‍वादिती विषया ।। संसार ०।।
-----------------------
(चाल पैशावांचुनि मौजा कैशा)
कन‍क कामिनी विश्रवमोहिनी निर्मुनि रचिली नरकाया
अहंपणाची अनुपम किल्‍ली दिधली तिजली गति द्याया ।।१।।
कामक्रोधादिक हे तत्‍पर अहंपणाला भ्रमवाया
आयुष्‍याची मर्यादा ही गुप्‍त ठेविली समजाया ।।२।।
सुमती कुमती जोड ठेविली विष्‍यी जीवा वळवाया
जोर चालतो कुमतीचा तो सुमती जाते ती वांया ।।३।।
सुविवेकाचें नांव कशाचें विषयाची गोडी भारी
कर्ता हर्ता सर्व एक मी हीच भावना जगिं सारी ।।४।।
खेळ मजेचा चालें साचा कनककामिनाच्‍या पायीं
विश्रांतीचे नांव नको तें धडपड ती चालू राही ।।५।।
-----------------------
( फुलें वेलीचीं । भूषणें तशीं युवतीचीं)
धन हें साचें । जो भोगिल होतें त्‍याचें ।।
एका ठायीं कधिं ना राही । चंचळ तें पळतें पाहीं ।
कलहातें कारण होई । काय सुखाचें । माहेर होय कष्‍टाचें ।।धन ०।।१।।
परिवार हाहि कोणाचा । घेतलें दिलें तरि साचा
न पुसे तो वैरी त्‍याचा । सुखाला साचें । संकटीं कोण कामाचें ।।धन ०।।२।।
हा अहंपणाचा तोरा । चाले वपु तोंवरि सारा
मोहाचा पडतो मारा । डामडौलाचें । पोकळ घर अवघें त्‍यांचें ।। धन ०।।३।।
-----------------------
१०
(चाल निर्धतेनें लज्‍जा उपजे)
संसाराची आवइ भारी मनुजाच्‍या अंतरीं । वाढे क्षणोक्षणीं किति तरी ।।१।।
माझें माझें धरूनी ओझें सर्वा ठायीं फिरें । जडलें पिशाच हें जणुं खरें ।।२।।
चंचल सारें क्षणभंगुर हें वाटेना कधीं मना । सोशी नानापरि यातना ।।३।।
मोहसागरीं बुडतां ऐशा सुटका कैशी घडे । माया दढतम आंगीं जडे ।।४।।
-----------------------
११
(चाल परमार्थाचा हा)
छळिती या तॄष्‍णा जीवा नाना भवसागरी । भवसागरीं ।।छळिती ०।।
संसॄतिच्‍या लाटा भारी । उठता विकाराकारी ।
सुखविति दुखविति परिवारीं । मोह अनावर वाढतसे ।
सुटतें न मतिचें पिसें । गोंधळे मन अंतरीं ।। छळिती ०।।
अहंपणानें थारा न मिळे । सुविवेक तोहि गळे ।
अहंपणानें चित्‍त चळे । स्‍वस्‍थ्‍पणा मुळिं ना कधीं ।
छळिती सदा उपाधी । भ्रांतता जगिं ये पुरी ।। छळिती०।।
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved