सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
विश्‍वजननी तव अगाध महिमा वर्णु शके ना विधाता
विश्‍वजननी तव अगाध महिमा वर्णु शके विधाता
सर्वस्‍थळी तव प्रभाव विलसत तुझीच अवरित स‍त्‍ता
ज्ञानि भ्रमविसी मोह बंधनि अलिप्‍त राहुनि स्‍वत:
विष्‍णूमाया तू शि‍वशक्ति षण्‍मुख गणेश माता
 
शंकर झालो जगद‍वंदनिय तव कर हाती घेता
ब्रम्‍हाविष्‍णु इंद्र चंद्र रवि तव पदि ठेविती माया
चारी वेदही साही शास्‍त्रे शिणली तुज आकळता
 
त्रिभुवन व्‍यापक तू करूणामयी तू कर्ति करविती
कशी करुं तव स्‍तुती स्‍तवने मी कुंठित हो मम मति
काया वाचा मनबुध्‍दी सह तुजसि पुजावे ध्‍यावे
नामस्‍मरणी रंगुनिया तव मी मजला विसरावे
 
आर्त माझिया भाव मनातील गंगोदक तूं मानी
स्‍नानास्‍तव जरि तुला अर्पिले कलशामधले पाणी
देह झिजावा चंदनापरि वर्जित पर धन दारा
तेच तुझया प्रदि मी वाहियले चंदन कुंकू हळिद्रा
 
सौंदर्यातील सुंदरता तूं नटविसी सृष्‍टी फुलांनी
ऋतुकालोदभव फुले वाहिली तव पदि मी प्रेमानी
तू तर स्‍वामीनी सर्व जगाची उणे तव ऐश्‍वर्या
भावभक्तिमय स्‍तुतिपाठानी प्रसन्‍न हो शिवभार्या
 
तुझेच करितो स्मरण निरंतर हिमधरनगनंदिनी
स्विकारूनी घे मानसपूजा हदयी मम प्रक‍टुनि
परिसासम तव नामस्‍पर्शे देह तोह हो सोने
वाहियल्‍या पदि देह पादू‍‍‍का तुज आहे स्विकरणे
 
सदभावाचा धूप उजळले दिप दोन मम नयने
आरति केलि ओवळुनि मम पंचप्राण प्रीतीने
बहु केली पक्‍वानि कसोशि आवड तव जाणोनि
ताबुंल घे स्विकारूनि रवण हे नारळ अहेव लेणि
 
असेल काहि न्‍यून राहिले क्षमा करि जगदंबे
लोटांगण पदि घालुनि विनवि पावन कर अविलंबे
प्रदक्षिणेच्‍या पदोपदि तव पाप जाई मम विलया
अविचल राहो भक्ति पुन्‍हा दे जन्‍म तुझे यशगाया
 
विजयादशमी मंगलवेळा शिलांगणाची आली
विजयादशमी मंगलवेळा शिलांगणाची आली
पालखी जगदंबेची निघाली । अंबिका शिलांगणास निघाली
 
गाद्या गिरदया गालीच्‍यावर
अलंका्र लेऊनि मनो‍हर
तेजोमय शोभली । अंबिका शिलांगणा निघाली
 
वाजंत्रि डफ संबळ वाजति
सुरसनई झांजा सूर मिळविति
मंगलवाद्यें सुस्‍वर गर्जति
उधळित गुलाल लाली । अंबिका शिलांगणास निघाली
 
अबदागिर किति मागे पुढती
च‍वरि चां‍दिची कुणी ढाळती
भक्‍त मंडळी गाती नाचती
भजनि तल्लि‍न झाली । अंबिका शिलांगणास निघाली
 
आल्‍या आल्‍या कुणि सुवासिनी
नारळ ओटी तबके घेऊनी
ओटी भरूनि तृप्‍त मनानी
नतमस्‍तक पदि झाली । अंबिका शिलांगणास निघाली
 
ऐसा मंगल दिसे सोहळा
भक्ति प्रेमाचा जणु मेळा
नामस्‍मरणी तल्लिन झाला
पाहूनि दृष्टि निभाली । अंबिका शिंगणास निघाली
अंबिके तू तर तेजस्विनी
अंबिके तू तर तेजस्विनी
कोटिरविची दिप्ति विलसते मुखकमली लोचनी
चर्मचक्षुनी कसे पहावे रूप मुझे स्‍वामिनी
रूप पहाता डोळे दिपुनि जातिल अंधारूनि।
 
दैत्‍य मातले अवनितलावरी त्रिभुवन तैं व्‍या‍पिले
हताश झाले सर्व सुरेश्‍वर त्राण न त्‍या राहिले
शक्ति सुरांची झालिस तूं गे दैत्‍यासुरमर्दिनि ।
 
दृष्‍टीमात्रे दुष्‍ट दैत्‍य खळ भस्‍म करि अशक्‍य न तुला
तुझिया हाति मरण रणांगणि मोक्ष तया लाभला
हेतुने त्‍या बधिले त्‍यांसी झालिस रणरागिणी ।
 
तेजे दिपले सर्व सुरेश्‍वर नतमस्‍तक जाहले
मुकूट रत्‍नमणि किरिटांचे तव चरणावरि सांडले
ख्‍याति झाली तुझी त्रिभुवनी महीषासुरमर्दिनि ।
 
रणचंडि तू काली कराली दानव कुळ भक्षिले
देवा देवुनि अभयदान तूं शरणागत रक्षिले
निजभक्ता तू कल्‍पतरूसम ईप्सितवरदायिनी ।
 
तवपदि मति स्थिर दृढ भक्ति कर हेच असे मागणे
तव तेजाचा एकच अणुकण उजळल अमुचे जिणे
अज्ञानाचा तिमिर संपवुनि ज्ञानोदय कर झणि ।
 
जगदंबे तुजविणे कोण न मम कैवारी
जगदंबे तुजविणे कोण न मम कैवारी
धावुनि वाचविले सं‍कट नित्‍य निवारी ।
 
तव वत्‍सलेला त्रिभुवनी उपमा नाही
दीनार्तास्‍तव तू धाव घेसी लवलाही
उतराई कसे तव व्‍हावे भवभयहारी
जगदंबे तुजविण........
 
तव अगम्‍य महिमा न कळे सुरश्रेष्‍ठांना
मग कसा कळावा मजसम अज्ञजनांना?
तु माय आमुची तारी अथवा मारी
जगदंबे तुजविण........
 
तव सेवा काही न घडते माझेकडुनि
परि नित्‍य शुध्‍द तू प्रेमळ वत्‍सलजननी
तव मूर्त वसावी मम मानस देव्‍हारी
जगदंबे तुजविण........
 
तव स्‍मरण करावे नित्‍य मनि जगदंबे
तू रा‍ही सनिध क्षणभर मज न विसंबे
मम जीवन व्‍यापुनि झडकरि मन उध्‍दारी
जगदंबे तुजविणे........
 
तव माया पटला दूर करी अंविलंबे
मम जीवशिवाची भेट घडवि जगदंबे
तरि सार्थक होईल नरतनु हया संसारी.
जगदंबे तुजविण ........
 
धन‍दारा सुतगृह वपु यश वैभव पाही
तव कपा कटाक्षे सर्व मिळाले काही
परि वृत्‍ती रमली तव पद मज स्विकारी
जगंदबे तुजविण........
 
तू स्‍वये येउनि बंधन मम तोडावे
मी संकटि या भवसागर पार करावे
इतु‍के तरि कर तू शंभुचित्‍त चकोरी
जगदंबे तुजविण........
 
 
 
 
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved