सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
राग चंद्रकंस ताल नाटकी त्रिताल
तुझी मजवर ही कृपा केवढी।
लक्ष सतत गे सतत मजकडे
संकटि घेसी उडी। तुझी मजवर ही कृपा केव्‍हाढी
ऊनराई तव होऊ कसा मी जगदंबे शेवटी
तुझी मजवर ही कृपा केवढी।
 
उत्‍तम कुळि मज जन्‍म दिला, तू ज्‍याची कुलदेवता
तव भक्‍तीचा आवड उपजे, सहज मनि सर्वथा
सुखदु:खि मम सांगाती तूं, रक्षियले घडि घडि
तुझी मजवर ही कृपा केवढी।
 
तुझया कृपेने ऐहिक वैभव, धन सुख मी सेविले
मम सुत दुहिता कांतेसह तुज यथाशक्‍ती पुजिले
रंगुनि तव पदि, गेलो विसरुनि, मी मजला घडि घडि
तुझी मजवर ही कृपा केवढी।
 
हे करुणामयि जगदीश्‍वरी तव प्रेम कसे आगळे?
कुपुत्र मजसम, मी नच लायक, तव प्रेमा, प्रेमले!
विश्‍वजननि तव अगाध लीला, वंदन तुज घडि घडि
तुझी मजवर ही कृपा केवढी।
 
कलत्र तनया सुत आप्‍तावर, सतत कृपा ठेवणे
तव पदि स्थिर मति, दृढ भक्‍ती कर, हेच असे मागणे
अमृतदृष्‍टी सदा असावि, स्‍मरण घडो घडि घडि
तुझी मजवर ही कृपा केवढी।
 
जेष्‍ठेसह ये गौरि कनिष्‍ठा प्रतिवर्षि भेटाया
जेष्‍ठेसह ये गौरि कनिष्‍ठा प्रतिवर्षि भेटाया
स्‍वागत करण्‍या वाद्ये वाजवु सुस्‍वर गजर करुया
बैठक सजवा सुरेख टाका भर्जरिचा गालिचा
पडदे लावा किनखापाचे ज्‍यास किनारीजरि‍च्‍या
 
सुरेख रेखुनि‍ रांगोळि‍ही नक्षीदार दारात
सोनपाऊलि मिरवित आणा बहिणी दोघी घरात
जेष्‍ठा गौरि उभी कधीची मागिल दारात
पुढील दारी गौरि कनिष्‍ठा दिसे दिमाखात
 
उंबरठयावर मधल्‍या दारी भेटतील हया बहिणी
माप उलथुनि विखरुनि जातिल तांदुळ मोत्‍यावाणी
सर्व घरातुनि मिरवित आणा दावा सर्व तयास
कृपाकटाक्षे सुखवैभवहि येईल विनाप्रयास
 
परोपरि पक्‍वान्ने समर्पुनि नेवैद्याचे ताट
भावभक्तिच्‍या स्‍‍तुतिपाठासह करा पुजेचा थाट
वस्‍त्रभुषणे करा समर्पण खण नारळ ओटीत
करुनि प्रार्थना शरण पदि व्‍हा ईश्‍वरि भक्‍तांकि‍त
 
अवहेलुनि जेष्‍ठेस म्‍हणति जन नकोच ही अवदसा
लक्ष्‍मी पाठी मात्र धावती जिचा नसे भरवसा
खिन्‍न जा‍हली मनी कनिष्‍ठा पाहुनी तिची उपाक्षा
योग्‍य मिळावी जगी प्रतिष्‍ठा हीच मनात असे अपेक्षा
 
प्रतिवर्षि मम बहिणीसह मज द्विरात्र जे पुजतिल
त्‍यावर कृपा करिन मी त्‍यांच्‍या विपदाही सरतील
यास्‍तव झाली रुढ प्रथा हे पूजन भाद्रपदात
रावरंकहि करिती पुजन प्रतिवर्ष सदनात
 
श्रीमंती वा गरिबी येणे हे तर दैवाधीन
चित्ति असावि मन:शांति अन हृदयि समाधान
प्रतिवर्षाच्‍या पूजनातला आशय हाच असावा
सुखदु:खी मन अविचल राहो विसरन प्रभुचा व्‍हावा
वरदाङभयकारी सदा शिव करि तूं तर जगदाधारी
वरदाङभयकारी सदा शिव करि तूं तर जगदाधारी
कृपावलंबन करि अविलंबे मातान्नपूर्णेश्‍वरी
शांतवतीङधीश्‍वरी अंबिके काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकरी
 
सुवर्णरत्‍नांकित कमलासनि विश्‍वजननी बहु शोभे
नाना रत्‍ने मुकुटि हिरण्‍मय कुंडल कर्णि विलोभे
तूं कौभारि गणेशजननी काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
सौदर्याची रत्‍नाकरि तूं तेज न भावे वदनी
चंद्राङर्काग्निहि जाति दिपांनी तुजपुढती जगजननी
तूं करुणामयि कृपासागरी काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
कोटिकोटि रविशशि अग्निहुनि तेज तुझया गे नयनी
कृपाकटाक्षे जन्‍मांतरिचि दुरिते जाती विरांनी
हिमनगनंदिनी तूं दाक्षायणि काशिपुराधीश्‍वरी
हिमनगनंदिनी तूं दाक्षायणि काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
सौभाग्‍याचि तूं माहेश्‍वरी तूंच उमा तूं गौरि
तूं दिपांकुरि विज्ञानाची सदान्‍नपुर्णेश्‍वरि
श्री विश्‍वेश्‍वर म‍न:प्रसादिनि काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
ओमकाराची तूं बीजाक्षरी तूं अर्धांगी शिवाची
लीलानाटक सूत्रचालनी भगवति कांचिपुरची
रिपुक्षयकरि तूं विश्वेश्‍वरी काशिपुराधीश्‍वरी 
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
शंभुमानस हंसि दुर्गा शिवशक्ति तूं माया
कृपाप्रसादे तुझिया जाईल मायाबंधन विलया
सदैव भक्‍ताभिष्‍ट करि तूं काशीपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
समस्‍तवांछन पूर्ण करि तू मोक्षकरि भय‍हारी
सर्वमंत्ररुपीणि सति तूं जगदंबे मनहारी
मूलाधारी कर्ति हर्ति काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकारी ।
 
भवतापाने दग्‍ध शरण तुज कलत्रतनयासह मी
पदपद्यार्पित चित्‍तवृति मम रमु दे तुझाच
अमृतदृष्‍टी सदा असावी काशिपुराधीश्‍वरी
वैराग्‍यासह ज्ञानाची मज दे भिक्षा लवकरी
 
सदानंद मेवा भक्तिचा नित्‍य नित्‍य मज द्यावा
जगदंबे तव सेवेस्‍तव मज पुर्नजन्‍महि मिळावा
उर्वरति मम काळ जगातील जावो तव सेवेत
माय माऊलि तुझेच चिंतेन नित्‍य घडो मनात
 
उठोनिया प्रात:काळी
उठोनिया प्रात:काळी
स्‍मरा नित्‍य शैलबाळी
प्रेमांकित चंद्रमौळि
शिव स्‍वयें सांब झाला ।
 
अष्‍टभुजा कमलावरी
दिप्ति दिव्‍य सुमुखावरी
अलंकार परोपरि
सर्वांगि हो विराजित ।
 
किरिट कुंडलांचि शोभा
रुप लावण्‍याचा गाभा
हिरण्‍मय रत्‍नप्रभा
मुखावरि विलसते।
 
देव शरण येता चरणि
तूच झालि रणरागी‍णि
असुर दुष्‍ट निर्दाळुनि
दिले अमय सर्व देवा।
 
संहारुनि खळ दैत्‍यासि
तुवा रक्षिले देवासी
मायतात तूं भक्‍तांसी
जपतसे रात्रदिन ।
 
तूच रमा तूचि उमा
गहन तुझा दुर्गम महिमा
निज भक्‍ता कल्‍पद्रुमा
झणि होसी तूं अंकित ।
   
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved