सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
तव नामरंगि मम जीवन पट हे रंगवि जगदंबके!
तव नामरंगि मम जीवन पट हे रंगवि जगदंबके!
जीव जन्‍मता करि रूदने परि हासे जग ते धवा
अशी कृति कर हासत जा तूं रडव अखिल विश्‍वा
शरीर जणु हे वस्‍त्र असं ते शुभ्र धवल असु दे
जीवन पट हे दोन घडिचे ध्‍यानी ठेव इतुके
मधुनाम रंगि मम जीवनपट हे रंगवि जगदंबिके
भक्तिरंग तव मुरु दे अवधा वस्‍त्रावरि अंबिके
जन्‍मभरी जरि धुतले अविरत रात्र दिन रजके
फाटुनि जावो वस्‍त्र परि ते होऊ न दे विटके
तव नाम रंगि मम जीवनपट हे रंगवि जगदंबि
गतकर्माचे रेशिमधागे पंचतत्‍वी मिसळले
अष्‍टकमल दल चरख्‍यावर त्‍या लीलेने विणिले
कालावधि नवमासानंतर पट आकाश आले
सुखदु:खाच्‍या चक्रावर्ति देसी तया गिरके
तव नाम रंगि मम जीवनपट हे रंगवि जगदंबिके
कुसंगती त्‍या मळिन करी परि अनुतापे शुध्‍दता
सुसंगतिने शुभ्रपणा, दे अनुभूति विविधता
गुरुकृपेने ज्ञान रंग ये ईशकृपे श्रेष्‍ठता
घडि ब‍सविणे वा बिघडविणे तव हाती असे अंबिके
तव नाम रंगि मम जीवनपट हे रंगवि जगदंबिके
 
इतुके तरी मज द्यावे अंबे । इतुके तरी मम धावे ।।
इतुके तरी मज द्यावे अंबे । इतुके तरी मम धावे ।।
अंतकाळि तव नाम मुखि मम आनंदाने यावे ।। धृ।।
 
सतत तुझे मी केले चिंतन
नामी विसरुनि गेलो मीपण
अखेर घडि ही व्‍हावी पावन
त्‍वद्रुपात विरावे । इतुके तरी मम द्यावे ।
 
प्राणहरण मम तूच करावे
मायापशी मी न फसावे
तव पदि माझे मन गुंतावे
रुप चित्ति तुला ध्‍यावे । इतुके तरी मम द्यावे ।।
 
क्‍लेश नसावे माझया शरीरा
व्‍याधि उपाधि न जरा जर्जरा
तव गुण गाता तुजसि पहाता
संपुनिया मी जावे । इतुके तरी मम धावे ।।
पुंडलिकाच्‍या भक्तिप्रेमा
पुंडलिकाच्‍या भक्तिप्रेमा
उममा नसे कशाची
साक्ष ही मूर्ती उभी देवाचि
 
मायपित्‍याची पाहुनि सेवा
विस्‍मय वाटे, कौतुक देवा
स्‍वये प्रकटले पुंडलिकास्‍तव
त्‍यास क्षि‍ति ना त्‍याची ।
 
“पुंडलिका! बघ मी हा आलो!
तव भक्तिस्‍तव मी अवतरलो
प्रसन्‍न तुजवर, माग मला वर “
त्‍यास न परवा त्‍याची ।
 
“उभे रहावे देवा! क्षणभर
वीट फेकितो त्‍या वीटेवर “
उभी राहिली प्रेमाखातर
विठठल मूर्त कधीची ।
 
पुंडलिकाचे भक्ति वैभव
अगणित भक्‍तांना दे अनुभव
परब्रहम साकारे विटेवर
खूणच जणु प्रेमाचि ।
 
खंत मज छळते निशिदिनि अंबे
खंत मज छळते निशिदिनि अंबे
मम मन तव पदि मुळि न विसंबे ।
 
मन चंचल बहु सदैव फिरते
तव चरणि पळभर हि न ठरते
काय करू मी? मज नच कळते
संभ्रमी नित्‍यं मी अंबे
मम मन तव पदि मुळि न विसंबे ।
 
ध्‍यानी रमावे मज बहु वाटे
आळस परि मज सोडि न माते
निद्रा सखि मम, मज नागविते
काय करू मी अंबे?
मम मन तव पदिमुळि न विसंबे ।
 
सकळ चराचरि तुझीच वसली
तूच करावि अशी चमत्‍कृती
चंचल मन्‍मन स्थिर करि तव पदि
हीच विनवणि अंबे
मन्‍मन पायि तुझयाच विसंबे ।
 
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved