पूर्व संचिताविना न काहिच आणियले तूं बरोबरी |
पूर्व संचिताविना न काहिच आणियले तूं बरोबरी |
जातानांही हात मोकळे धरिसी कां रे हाव परि? |
प्राप्त स्थितिचे स्वागत कर तूं चित्त ठेव आंनदी |
सुखदु:खि मन अविचल असुं दे अंबा पदारविंदी |
|
हाव तुझी हव्यास येथला पूर्ण न होणे कधी |
जाणुनिया समजावि मना जे नित्य असे स्वच्छंदी |
लटक्या माया मोहबंधनी जीव भ्रमर हा बंदी |
सुखदु:खि मन अविचल असु दे अंबा पदारबिंदी |
|
तुला मिळाले जे जे त्यातच मानि समाधान |
होई स्थिती तुज प्राप्त, तीच नू प्रभु इच्छा जाण |
कालक्रमणा करि आनंदे हताश हो नच कधी |
सुखदु:खि मन अविचल असु दे अंबा पदारबिंदी |
|
हारजीत ही लटकी येथिल जीवन दोन घडीचे |
कठपुतळी सम विश्वनात्य हे चालवि कर नियतीचे |
चोख तुझं तूं काम करूनि तव, चित्त प्रभुचे वेधी |
सुखदु:खि मन अविचल असु दे अंबा पदारबिंदी |
|
विसरुनि जा तूं हार प्रहारी हि नकोच त्याची खंत |
नामस्मरणि रंगूनिया तूं विसर तुझे तूं स्वत्व |
भक्ति वैभव असे मिळवे तूं, नकोच अन्य उपाधी |
सुखदु:खि मन अविचल असु दे अंबा पदारबिंदी |
|
“कुटुंबियाचे दु:ख दैन्य दारिद्रय दूर झणि व्हावे । |
“कुटुंबियाचे दु:ख दैन्य दारिद्रय दूर झणि व्हावे । |
जगदंबेला माझ्यासाठी आपण हे सांगावे |
हीच विनविण प्रिय शिष्याची ऐकावि गुरु देवे ।“ |
हांसुनि वदति रामकष्ण “का जाईनास स्वये? |
माय माऊली अति करुणामायि! निजसी तूं भेटावे |
आजच जाईनास भेट तूं समक्ष तिज मागावे” |
आतुरलेला नरेंद्र पाही वाट प्रहर रात्रीची |
प्रवेश करिता मंदिरात मति गुंग जाहली त्याची |
जगदंबेची मूर्त मनोहर सजीव साकारली |
रुप संपदा कारूण्याची नयना समोर आली । |
नमस्कारूनि पदारविंदा पहात राही नरेंद्र |
विसरुनि गेला हेत मनिचा नेत्र होति प्रेमार्द्र! |
जवळ घेऊनि जगनमाऊलि तयास मग कुरवाळे |
“काय हवे ते माग! निश्चयें दिले तुला मी “बोले |
“आई! मला तव घडले दर्शन हेच परम मम भाग्य! |
दे मज ज्ञाना, विवेक, भक्ति आणिक ते वैराग्य!“ |
परत फिरे मग शिष्य विचारी तयास गुरु अधिकारी |
“पूर्ण जाहली ना तव इच्छा, माता प्रेमळ भारी!“ |
“गुरुदेवा! मी खरोखरी मम हेतु बोललो नाही! |
विसरुनि गेलो रुप पहाता प्रेममूर्त लवलाहि“ |
पुन्हा पुन:पुन्हा हे असेंच घडले त्या रात्रीच त्रिवार |
स्वामी विवेकानंद म्हणोनि प्रसिध्द होई नरेंद्र! |