आला आला अश्विनमास । मनि वाटतो उल्हास। |
आला आला अश्विनमास । मनि वाटतो उल्हास। |
जाउ भोयरे गावास । अंबाबाई पाहु डोळा ।। |
नवरात्र महोस्तव । राउळात गर्दी दाटे । |
जगदंबिका भक्तांचि । दर्शनासी आटपिट ।। |
डोळे भरुन पाहु अंबा । हास्यादमुखि जगदंबा । |
पाहताचि पाहु वाटे । मन तृप्त मुळि ना होय ।। |
अष्टभुजा आयुधानि । शोभे रुप कमलासनि । |
मंद धूप सुवासांनि । कोंदटला हो गाभारा ।। |
पुढे दिसे दिव्यदुर्ग । निर्दाळण्या असुर गर्व । |
अनुष्ठान मांडियले सर्व । अर्थ ध्यानि निट धरा ।। |
घट मांडुनि त्यावर । फुलमाळा वाहियेल्या । |
नंदादिप आवर्जुनि । तेल तुपांचे तेवति ।। |
चाले सप्तशती पाठ । निनादला मंत्र घोष । |
स्तवन आरति अंबेची । प्रदक्षीण पंचपदि । |
भक्त रंगले स्तवनी । आनंदले गुणगानी ।। |
अंबा पाही हा सोहळा । कौतुक हे वाटे मना । |
ऐसा आनंदि आनंद । आठ दिन हाच छंद । |
ढोल लेजिमाची साथ । टाळ मृदुंगाच्या नादा ।। |
होम होती अष्टमीस । विप्र गर्जे मंत्रघोष । |
श्रवण करिती सर्वभक्त । गुंगुनिया जाती ।। |
दस-याची शुभवेळा । स्नानासाठी अत्तर घाला । |
अभीषेक संततधार । भरा कळशी चांदिनी ।। |
पुजा करा आनंदाने । धूपदीन करू प्रेमाने । |
पुरणपोळी नैवेद्याने । तृप्त करावि जगदंबा ।। |
विडा दक्षणा तांबुल । साडी चोळी खण आणा । |
ओटी भरा नारळांनी । पायी लोटांगण घाला ।। |
रंगुनिया नामस्मरणी । उदय होईल अंबा मनि । |
उदयोsस्तु म्हणा म्हणा । मायापटल दूर होय ।। |
|
नवरात्रोत्सव घेऊनि आला मंगल अश्विन मास |
नवरात्रोत्सव घेऊनि आला मंगल अश्विन मास |
रंगवुनि घट सुरेख सजवु स्वागत करुया खास |
|
फुलाफुलांच्या तोरणमाना बांधुनि दारोदारी |
विद्युतदीपे झुंबर उजळिल प्रकाश देवघरी |
मंगल स्नापनानंतर करु या घटस्थापना पूजा |
नंदादिप तेलतुपाचे सतत स्त्रउ दे ओजा |
|
झेंडु शेवंतीच्या माळा अर्पु घर देवास |
पूजन करुनि तन्माय होउनि करु दुर्गापाठास |
|
अनुष्ठान हे नऊ दिवसांचे आवर्जुनि करु नीट |
करु आरती पंचपदीसह विप्रभोजनी थाट |
|
कुमारिकांचे पूजन करुया यथाशक्ति हवने |
सुवासिनीची भरू या ओटी अर्पुनि अहेव लेणे |
|
जाऊ शरण पदि जगदंबेच्या करुनि स्तुति प्रेमाने |
कृपाप्रसादे उदय हो तिचा सार्थक येथिल येणे |
|
माया बंधन जाईल विलया तिच्या कृपेने खास |
मात्र असावा रात्रदिन मनि जगदंबेचा ध्यास |