सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
अंबे!
अंबे!
निरंतर चिंतन तव घडु दे
सर्वस्थळि तव रूप मनोहर अंबे नित बघु दे।
 
श्रवणि असावि तव यश गाथा
नेत्रि रुप तव पदि नत माथा
मनन करावे ध्‍यान तुझे नित
इतके मज तूं हे ।
 
अष्‍टभुंजाकित सुरम्‍य मुर्ति
कमलासनि सुख नयना दे ती
सुवर्णकुंडल दिप्‍ती मुखावर
अंतरि मम वसु दे
 
तुझ्याच अर्चनि पुजनि भजनि
लक्ष असावे तव सम चरणि
याविन अन्‍य नको, तव स्‍मरणि
आवडि नित असु दे ।
 
जगदंबा पदकमलि मनो‍हर
जगदंबा पदकमलि मनो‍हर
सुवर्ण नुपूर पैंजण सुंदर
सुरेख नक्षि गौरपदावर
मैंदि अळिता रेखियला
दाखवि मज पद‍कमलाला ।
 
स्‍वर्ण तोरडया घुंगळवाळे
शोभवि तव शुभ पद वेल्‍हाळे
रत्‍न जोडवि मासोळि वळे
साज बोटि शोभे अतुला
दाखवि मज पद‍कमलाला ।
 
हयाच पदि सुखर नत झाले
रत्‍नमुकुट हया पदि किती झुकले
असुर सर्व भयव्‍याकुळ झाले
काळ तव रूपे रणि आला
दाखवि मज पद‍कमलाला ।
 
भक्‍त सर्व हया पदि आसुरले
तन्‍मय होउनि भान विसरले
स्‍वर्ग युक्तिहुनि हेच पद मले
म्‍हणति सार्थक जन्‍मचि झाला
दाखवि मज पद‍कमलाला ।
 
हया चरणांचे ध्‍यान निरंतर
मूर्त वसो मम हृदय पटावर
श्रवणि नित असो कीर्तन सुस्‍वर
ध्‍यास असा मज आर्त लागली
दाखवि मज पद‍कमलाला ।
 
 
 
 
 
 
कुलस्‍वामिनी अंबे तुजसम
कुलस्‍वामिनी अंबे तुजसम
तूच दयाळु महान
भगवति, दे मज इतुके दान।
 
नकोच मजला ऐहिक वैभव
लौकिक नांव न मान मरातब
पूजन अर्चन पदसेवन तव
घडो सदोदित माझे कडुनि
स‍हज सुलभ नित छान
भगवति, दे मज इतुके दान।
 
श्रवणि असावे तव स्‍तुतिपाठा
नयनि रुप तव चरणि माया
तव नामी मी रंगुनि जाता
विसरुनि जावे माझे मीपण
चित्ति वसो तव ध्‍यान
भगवति, दे मज इतुके दान।
 
नित्‍य चिं‍तनि रुप असावे
नाम तुझे मज सहज स्‍फुरावे
तव गुण ध्‍यावे भावे गावे
असेच जावो अवघे जीवन
असो तुझा अभिमान
भगवति, दे मज इतुके दान।
 
अपार हा भवसागर दुस्‍तर
अपार हा भवसागर दुस्‍तर
वृथा बाळगिसि याचे का भय?
सहजचि सुलभ उपाय
शरण जा, धरि जगदंबा पाय।
 
सर्व चराचर मोहपसारा
जीव गुंतला त्‍यात बिचारा
कोण करिल मग भवपरिहारा?
खंबिरा अंबा माय
शरण जा, धरि जगदंबा पाय।
 
शांतविण्‍या तव मनिची तळमळ
उगाच हुरहुर हदय उताविळ
खंत हरण करि तुझे मनोबळ
यास्‍तव सुलभ उपाय
शरण जा, धरि जगदंबा पाय।
 
व्यर्थ करिसी का माझे माझे
टाकुनि दे पदि अवघे ओझे
शरण तिला जा मनि का लाजे?
हाच खराच उपाय
शरण जा धरि जगदंबा पाय।
 
सोडी अहंता गर्व फुकाचा
नामस्‍मरणी रत हा साचा
शुध्‍द भाव परि ठेव मनीचा
कृपा न हो मग काय?
शरण जा, धरि जगदंबा पाय।
 
शरण तिला जा कृतज्ञतेने
वश कर तिजला दृढभक्तिने
जीवन अवघे होईल सोने
कृपा करिल भवजाय
शरण जा, धरि जगदंबा पाय।
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved