सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
तुवा कृपेची शाल पांघरुनि केले मजसी ऋणी
तुवा कृपेची शाल पांघरुनि केले मजसी ऋणी
उतराई तव कसा होई मी? मायकुलस्‍वामिनी
 
तू तर अमुचे कुलदैवत तव नित्‍य करावी पूजा
बाळाकडू हे अम्‍हा मिळाले समस्‍त कुलवंशजा
 
सेवा करिता जरी प्रकटल्‍या उदंड अडि अडचणी
तूच वारिल्‍या अगाध आहे लीला तव जगजननी
 
बाळपणापासून लागली आवड तव सेवेची
पूर्वजन्‍म पुण्‍याई म्‍हणू की कृपाच तव मजवरची?
 
तुझया कृपेने मानमरातब सुख वैभव सेविले
अंतरलो ना तव चरणांना रात्रदिन पूजिले
 
मनी न उपजे कधी अपेक्षा कांहि मिळावे अशी
काय मागणे तुला? मनातिल सर्वच तू जाणसी
 
शाल मिळाली तव प्रेमाचे पांघरुण हे माते
सांग कधी मज दिसेल गे तव दिव्‍य रूप नयनावे
 
कातर वेळी व्‍याकुळले मन
कातर वेळी व्‍याकुळले मन
आसु दाटले भरले लोचन
ध्‍यास तुझाच असे रात्रदिन
करुणामयि करि! उदार तव मन
दोष न चित्ति धरी
भगवती! झणि मजसि स्‍वीकारी।
 
विसरुनि गेलो आजवरी तुज
जाळतसे अनुताप नित्‍य मज
खंत सदोदित सलते काळिज
उमजुनि घे तूं, सांगु कसे तुज?
मनि न धरावी अढी
भगवती! तव पद मी नच सोडी।
 
असतिल असु दें अवगुणराशी
बहुविध दोष तसे मजपाशी
चरणतली तव गंगा काशी
शरणागत तुज जरि मी दोषी
पावन कर मजसी
भगवती! अवघड नच तुजसी।
 
वय बहु गेले अवधि न उरला
पथ चुकलो मज मार्ग न दिसला
उर धडाडे कंपहि सुटला
कळिकाळाच्‍या पदरव आला
धाव कुलस्‍वामिनी
तुजविण कोण मला जननी?
स्वप्‍नात येऊनि कथिते मज बोलविते
स्वप्‍नात येऊनि कथिते मज बोलविते
आठवतो लिहितो श्रेय तुला परि माने ।
 
मी अज्ञानि मज कशी स्‍फुरावी रचना
परि तुझ्या कृपेने करू शकलो स्‍तुति स्‍तवना
 
हयातील दोष परि जे काही असतील
धनि मीच तयाचा, सार पहा तयातील
 
स्‍तुति स्‍तवने यातिल पहा भाव मन्‍मनिचा
अनुसंधानाविन हेतु न मम हदयींचा
 
मम ध्‍यानि म‍नी श्री जगदंबा जगजननी
चित्‍त चिंतनि वसते अंत:करणी
 
आजवरि जे जीवन व्यर्थ फुका ते गेले
नामस्‍मरणाविण मी मौजेस्‍तव घालविले
 
विनवणी तुझया पदि हीच असे जगदंबे
देणारच असशिल दे इतुके अविलंबे
 
राहिला असे मम उर्वरीत जो काळ
तो तुझयाच स्‍मरणि जावो तिन्हि त्रिकाळ
 
मज ऐहि‍क वैभव न‍को मान सन्‍मान
मोक्षही नको मज नकोच आत्‍मज्ञान
 
मज नसेच वांछा सुरवात दिन जाण्‍याची
परि एकच इच्‍छा पुरवावी मन्‍मनिची
 
मज पुर्नजन्‍म दे तुझयाच सेवेसाठी
साद्यंतच जावे जीवन ते तुझयासाठी
 
पुजनि चिंतनी नामी तुझयाच रमावे
जगदंब दयाधन धवल तुझे यश गावे
 
उत्‍तम काया आरोग्‍यास‍ह स्‍त्री सुख सुत संपत्ति
उत्‍तम काया आरोग्‍यास‍ह स्‍त्री सुख सुत संपत्ति
दिलेस तूं मज सारे का पदि जडे न माझी मती?
 
जगदंबे मज सांग मला मी काय करावे यांसी?
रुप चिंतनी तुझे मनो‍हर का न येई ध्‍यानासी?
असे कसे मम मन हे वेडे तव पदि कानच रति?
दिलेस तूं मज सारे कां पदि जडे न माझी मती?
 
पूजन भजनाचा कंटाळा दुरच स्मरणी नाम
आळस निद्रा यांतच गोडी आवडि सुख विश्राम
कसे न यांसी कळे न अजुनि स्‍वहित असे त्‍वत्‍पदि
दिलेस तूं मज सारे कां पदि जडे न माझी मती?
 
तूंच करावि किमया काही वेडे मन सुधरावे
नित्‍य रमेल तुझ्या पद चिंतनी असेच का‍ही करावे
तूंच आवरु शकसि त्याला विशाल त्‍याची गती
दिलेस तूं मज सारे का पदि जडे न माझी मती?
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved