सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
सांग ना ग आई मला ऐकदाच सांग
सांग ना ग आई मला ऐकदाच सांग
मला स्‍वीकारणार की नाही?
 
आजवरी तव दारातुनि कुणि विन्‍मुख गेले नाही।
संत वदति गे तुजसम वत्‍सल त्रिभुवनी दुसरी नाही।
निजभक्‍ता तूं अंकित होउनि रक्षिसी ठाई ठाई
अगाध महिमा परि तव वेदा शास्‍त्रा कळला नाही
कसा कळावा नजसम मूढा ज्ञान न मजसी काही
सांग ना ग आई..........
 
कुलस्‍वामिनी जरि तू अमुची कधी न मी तुज पुजिले
अर्ध्‍याहुनि जरि वय मम गेले तुला कधी ना स्‍मरले
कशी अता उपजावी भक्ति ममत्‍व सरतचि नाही
अचपळ मन्‍मन तवपदि रमु दे असेच कर तूं काही
सांग ना ग आई...........
 
तुझया वाचुनि अन्‍य कुणा मम कणव कशी गे यावी
श्री जगंदबे तुझया पदाविण्‍  अन्‍य नकोच विसावा
कृतज्ञतेने स्‍मरण घडो तव हीच आस पुरवावी
जगदंबे तव मूर्ति मनो‍हर अंर्तयामि वसावि
 
सांग ना ग आई मला ऐकदाच सांग
मला स्विकारणार की नाही ?
 
जगदंबा पद कल्‍पतरुसम
जगदंबा पद कल्‍पतरुसम
स्‍मरण निरंतर, खड नको
चरण कमल ते विसरु नको ।
 
अपार सुंदर प्रेमळ अंबा
भक्‍तांकित झणि हो जगदंबा
पथ भक्तिचा परि अवलंबा
संत वचनि या राहुनि निर्भर
विकल्‍प मनि तूं आणू नको । चरण कमल ते विसरु न‍को
 
या जागे अवघा मोहपसारा
जीव रमे परि त्‍यातचि सारा
कसा सुचावा मग सुविचारा?
स्‍वहित तुझं तुज करायचे तर
दृढ भक्ति तूं सोडू नको । चरण कमल ते विसरु नको
 
शरण तिला जा कृतज्ञतेने
वश कर तिजला दढ भक्ति‍ने
सार्थक होईल येथिल येणे
भवबंधन मग काय करिल तुज?
वृथा तयाचि खंत नको । चरण कमल ते विसरू न‍को
 
 
 
 
 
असावी जगदंबा पदि आस
असावी जगदंबा पदि आस
जगदंबा पद सत्‍य निरंतर
अवघे विश्‍व अशाखत नश्‍वर
कसा तव त्‍यावर रे विश्‍वास?
अजुन तरि धर जगदंबा पदि आस
 
दिसे भासते ते ते नश्‍वर
त्‍याचिच परि तुज हाव निरंतर
सुटे न तव हव्‍यास
अजुन तरि धर जगदंबा पदि आस
 
कधी न संपे माझे माझे
व्‍यर्थ वागविसी अवघे ओझे
लीन पदि हो कर तिज अर्पण
संपव तव सायास
अजुन तरि धर जगदंबा पदि आस
 
शां‍तविण्‍या तव मनिची तळमळ
उगाच हुरहुर हदय उताविळ
शरण तिला जा येईल मग बळ
हो भवपथ सुखद प्रवास
 
यमधर्मा रे तुच तुझयासम निष्‍ठुर न्‍यायी महान
यमधर्मा रे तुच तुझयासम निष्‍ठुर न्‍यायी महान
कोणि तव करू न शके अवमान।
भाऊ तुझयासम यमराजा नच
त्रिभुवनि तुजविण अन्‍य न कोणिच
वेद पुराणे म्‍हणति असे वच
यमयमिसाठी “यमव्दितिया
भाऊबिज महान । कोणि तव करू न शके अवमान
 
सृष्टिचे तू नियमन करिसी
सार्थ तुझे ’यम’ नाम मिरविसी
धर्मनीति तूं अचूक पाळिसी
संबोधुनि तुज ’धर्मराज यम’
देव करिती सन्‍मान । कोणि तव करू न शके अवमान
 
पापपुण्‍य तू सर्व तपासुनि
अंति जीवा नेसी प्रकटुनि
’काळ’ तुला रे म्‍हणती कोणी
’अंतक’ म्‍हणविसी प्राणहरही तव
आणिक नाममिधान । कोणि तव करु न शके अवभान
 
ज्‍या जीवाचे आयु सरले
मरणपाशी तूं त्‍या गुंतविले
’मृत्‍यु’ नामा यथार्थ केले
’सूर्यपुत्र’ तूं वैस्‍वत तव
पिता असे भास्‍वान । कोणि तव करु न शके अवभान
 
अनित्‍य या जगि नित तुं असशी
’जीव’ श्रमे परि आशा पाशी.
बाल युवा अन वृध्‍द प्रवासी
स्‍वहित करावे अशी वृत्‍ती नच
खंत न, तव अवधान । कोणि तव करु न शके अवभान
 
प्रभुचरणि जे तल्‍लीन झाले
नामस्मरणि रंगुनि गेले
जीवन अवघे प्रभुमय झाले
अशा जीवांना करुनि वंदन
हरिसी तयांचे प्राण । कोणि तव करु न शके अवभान
 
जीव जन्‍मला ठरे मरण क्षण
कधी, कुठे, केव्‍हा? न कळे पण
यमराजा! मी मानीन तव ऋण
प्रभुस्‍मरण नज घडु दे अंति
इतुके दे वरदान । कोणि तव करु न शके अवभान
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved