सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
6(राग-यमन ताल नाटकी त्रितालचाल-जिवलगा कधी रे येशील तू)
भगवती तूच तुझयासम तू,
अतर्क्‍य महिमा तव पदि हो नत
ब्रम्‍हा शिव विष्‍णु......  तूच तुझयासम तू ।।धॄ।।
 
त्रिभुवन व्‍यापक तूच भवानी
विष्‍णूमाया तूं नारायणी
वर्णू शकेना तुजसी कोणी
शक्ति शिवाची तू..... तूच तुझयासम तू ।।१।।
 
अगम्‍य तू तव अपार महिमा
कलिमलदहना शहन दुर्गमा
भक्‍तरुप सिंधु... तूच तुझयासम तू ।।२।।
 
तूच रेणुका माहुरगडची
अबांबार्इ कोल्‍हापूरची
दाक्षायणी तू तुळजापुरची
सप्‍तृश्रंगी‍ही तू..... तूच तुझयासम तू ।।३।।
 
तू तर धात्री आणि धरित्री
तू तर धात्री आणि धरित्री
त्राती तू संयोजक कर्ति
आदिमाया पुरुष् प्रकृति
 
हिमनग नंदिनी तू ....तूच तुझयासम तू ।।४।।
तू सुखहारक, दुखहारक तू
भवभयहारक विश्‍वजननी तू
संहारक तव रोष, परंतू
 
भक्‍तावत्‍सल तू......तूच तूझयासम तू ।।५।।
सर्व चराचरि तुझीच वसती
सुरमुनि योगिश्‍वर तुज स्‍तविती
अजाण बालक काय मम मति?
पावन करी मज तू......तूच तुझयासम तू ।।६।।
 
(चाल-मनी माझीया वसते गोकुळ मी राधा तू कान्हा प्रेमळ)
प्रगटवी जर अंबा सुंदर
हृदय असू दे पवित्र मंदिर ।। धृ।।
 
सातिक सोज्‍वळ वृत्‍ती असावी
दांयिक पापी नजर नसावी
मनि चिंता शुभ सर्व चरांचर
प्रगटवी जर अंबा सुंदर ।।१।।
 
आर्त मनिचा भाव असावा
कृतज्ञतेने स‍हजचि यावा
जप हो अनुसंधाने सत्‍वर
प्रगटवी जर अंबा सुंदर ।।२।।
 
परोपकारी वृत्‍ती असावी
अनुमूती परदुखा यावी
सरळ मनाने करिसी ते कर
प्रगटवी जर अंबा सुंदर ।।३।।
 
मानवसेवा धूप जळावा
सुंगध त्‍याचा परा करावा
प्रमुदित हो परमोदे सत्‍वर
प्रगटवी जर अंबा सुंदर ।।४।।
 
परदारा ती मानी कुंकू्म
द्रव्‍य पराचे ते हळदीसम
करि अर्पण ते श्रीचरणांवर
प्रगटवी जर अंबा सुंदर ।।५।।
 
भजन न नलगे तिज संतर्पण
होमहवन वा अर्चन वंदन
शुध्‍द भाव मन शुध्‍द आचरण
दाविल तुजला आत्‍मरूप खूण ।।६।।
 
क्षणभंगुर हे जीवन येथील अळवावरचे पाणी
क्षणभंगुर हे जीवन येथील अळवावरचे पाणी
टाकुनी जाणे इथेच इथली धडपड संपवुनि
ठेव सदा तू जाणिव याची नकोच गुंतू येथ
स्‍मर जगदंबा रात्रदिन मनि देईल भवपथि‍ साथ
 
सुखात सामिल सर्व सोबती आपत्‍काळी न कोण
देव आठवे त्‍यावेळी मग जाता धन स्‍त्री मान
विचार हयास्‍तव करि तूं पुरता हो सावध तात्‍‍काळ
जगदंबापद धडि धडि स्‍मर तूं विरेल मायाजाळ
 
बाल्‍य हरविले क्रिडेमाजी यौवनी धन स्‍त्री मस्‍ती
प्रौढपणि तनु हो दुर्बळ परि प्रपंचात आसक्ति
हारजित ही लटकी येथिल कशास होसी उदास
प्रपंच खेळा ऐसा, श्रीपदी नित्‍य असावी आस
 
कुलस्‍वामिनी श्रीजगंदबा पुत्रावत्‍सल खास
रंगुनि नामी अंतर्यामी तिचाच असु दे ध्‍यास
न लगे पूजन अर्चना तिजला यज्ञ याग सायास
शुध्‍द भाव मन शुध्‍द आचरणि प्रीति तिथेची खास
 
कृतज्ञाने शरण तिला जा जिंकि तिथेच प्रेम
परिस लागता लोहासी मग का न होई ते हेम?
कृपा तिथेची होता जाईल तुझे जिणे उजळुन
हवी मात्र तव असीम भक्ति देहभान विसरून
 
राग-भैरवी, ताल-नाटकी त्रिताल चाल-आई आम्हा आठवशिल ना ?
शरण तुला मी करि मज पावन
पथ चुकले लेकरु । भगवती! न‍कोच मजसी अव्‍हेरू
मला न माहित कवण्‍या रीती
तव पूजन मी करू । भगवती !...........
 
मंत्र तंत्र शास्‍त्रोक्‍त पुजाविधि
कसे करू? मन मज न बुध्दि
वय बहु गेले उरे न अवधि
धीर कैसा मी धरू । भगवती!...............
 
यज्ञ, याग बहु ब्राम्‍हण भोजन
कसे करवु मी जवळि मुळि न धन
कृपा कशी तव करू संपादन?
नको उपेक्षा करू । भगवती!...............
 
दीन पतित मी बहु ‍अपराधी
कुलस्‍वामिनी परि तूं उदारधी
अव्‍‍हेरील का माता जर कधी
पथ चुकले लेकरु । भगवती!...............
 
दावू कशी मम मनिची तळमळ
तूझया कृपेस्‍तव हृदय उताविळ
जगज्‍जननी तूं उदार प्रेमळ
आर्जव कितीदा करू । भगवती!............
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved