सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
तुझ्या विना मम मनिचे हितगुज
तुझ्या विना मम मनिचे हितगुज
सांगु कुणा जगदंबे?
कैवारी नच कुणी तुझयाविना
कुलस्‍वामिनी अंबे ।
 
उदंड आल्या अडी अडचणी मी न तुला विसरलो
अपयश प्रसंग आले बहुविध उमेद मी नच खचलो
स्थितप्रझ मी मुळीच नाही सामान्‍याहुति सामान्‍य
मनस्‍ताप मज बहुविध होता ढळते अनुसंधान
पूर्वजन्मिचे संचित माझे इतुके कां वाईट?
नामस्‍मरणे तुझिया त्‍याचा अजुनि न हो नि:पात
सत्‍वपरिक्षा न‍कोच घेऊस मी न तुझा दृढभक्‍त
सारुनि अडचणी वारूनि संचित मला करावे मुक्‍त
उमेद माझी नुरे पूर्वीचि ढळतो निजविश्‍वास
कशी टिकावी श्रध्‍दा तूजवर कशी उरावी आस?
योग्‍य तुला जे गमेल तैसे अवश्‍य आणि तू करावे
हिरमुसले मज नित्‍य ना करि, इतुके तरि तु बघावे
जे जे करशिल भविष्‍यकाळी तेच हिताचे माझया
असे बजाऊनि मन्‍मनास मी चरणि शरण गे तुझया
 
भजमन निशिदिनी श्री जगदंबा।
भजमन निशिदिनी श्री जगदंबा।
भवभयहारक अंबा
 
तुजसी तारक होईल अंबा ।
पहा तिचे रुप मम नेत्रानो
ऐका स्‍तुतिस्‍तवने कणीनो
पूजारत व्हा तुम्हिहि करांनो
वेश कर तिज अविलंबा
भजमन,...........
 
हे मम चित्‍ता! चिंतनि तिज धरि
रसने! तूं नामाते द्ढ धरि
प्रदक्षीण चरणांनो झडकरि
काया लोटांगण अवलंबा
भजमन,...........
 
आसनमांडि स्थिर धरि शरीरा!
तन्‍मय होऊनि ध्‍यान मनिधरा
लीन तिच्‍या पदि भवपरिहारा
चरण कमल न विसंबा
भजमन,...........
 
भाग्‍ये तुज नर जन्‍म लाभला
सार्थक कर तू वश कर तिजला
फेरा चौरयाशिचा चुकविल
खचितचि, कृपा करिल श्री अंबा
भजमन,...........
मना! चल रे चल जाऊ झडकरी
मना! चल रे चल जाऊ झडकरी
पाहु जगदंबा मनोहरी
अष्‍टभुजांकित शोभे कमळावरि
किरिट कुंडले तेज मुखावरी
मुसळ आणि घंटा शोभे करि
गांव वा‍की पाटली तोडे चुडे बिलवरी
अंगव्‍या मुध्‍या ही सर्व बोटावरी
बिंदी बिजवरा कानि कर्ण भुषणे
नाकि नथ हिरयांनी चमके फार
माळि मळवट केशर कस्‍तुरी
कुंकुम हळिद्रा नाक्षिदार
डोळियांचे कडा काजळ रेखिले
सिंदुराची रेखा भागावर
ल्‍यालि शालु हिरवा चोळी बुहेदार
स्‍वर्ण मेखलाहि दिसे कटिवर
पु‍तळि माळ तन्‍मणि हुशि साज गळसरी
शोभे मो‍हनमाळा गळाभर
एक मांडी घालुन सव्‍य चरण खाली
नुपुर पैजंण वाळे तोडे त्‍यावरी
चरणांचे बोटी विरोधा जोडवी
मासोळया नी वळे अंगठयावरी
श्रीमुख सुंदर हास्‍य मुखावर
भूषणे सुरेख सर्वांगावरी
गळा पुष्‍पहार सर्वांगि संसारी
शोभा देती गजरे सर्व करि
ऐसि जगदंबा पाहु डोळाभरी
चरणि लीन होउ वारंवार
 
आजवर तुज पुजिले तुज नित्‍य स्‍मरलो मी तुला
आजवर तुज पुजिले तुज नित्‍य स्‍मरलो मी तुला
हेच का फळ मग तयाला? कां प्रेम पान्‍‍हा आटला?
ठरवितो मी ऐक, करविसि तूं दुजे की त्यावरी
अल्‍पबुध्दि मज न समजं, तव तयातील योजना
योग्‍य जे, जे मम हिताचे मजसि ज्ञान न कल्‍पना
नित्‍य राहि शुध्‍द बुध्दि मी न वावगे वागलो
अ‍नुभुति मज येई उलटी मी न कारण समजलो
तुजवरी मम भाव दृढ, मज रक्षिसि तूं संकटी
संकटे परि नित्‍य येति येतिती ती नच एकटी
कां घडे हे नित्‍य नियमित हेच कोडे मज पडे
तव कृपे मजसी तयातहि मार्ग अवचित सांपडे
मज न समजे का सदोदित येति मजवर आपदा?
ढळविते मम ध्‍यान तव पदि, रुष्‍ट होता संपदा
ऐक आहे विनवणी मम मान्‍य तूं करशिल ना?
तव पदि मम लक्ष लागो हे तरी बघशिल ना?
तव रुकारावरति आहे जीव हा बघ टांगला
प्रेमपान्‍हा संपता तव मार्ग ही मम खुंटला
जे मनि भम येई माझया सर्व मी कथितो तुला
तूच माझि माउली तुज रक्षीणे वेडवा मुला
 
 
एका जनार्दनी (Ebook)
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved