सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
अभिषेकपुजा सुरू मंगल मंत्रोच्‍चार
अभिषेकपुजा सुरू मंगल मंत्रोच्‍चार
जगदंब मुर्तिवर सतत दुधचि धार
घन गंभिर घुमता मंत्रघोष विप्रांचा
मधुगंध दरवळे अत्‍तर विविध धुपाचा
लावण्‍यरुप हे प्रेममयिश्‍वरि करुणा
सुस्‍नात अंबिका सुहास्‍य प्रसन्‍नवदना
नटविले रूप नेसवुनि शालु शेले
षोडषोड पचारे पूजन भावे केले
आधीच रुप ते सुरम्‍य गोजिरवाणे
शोभवि सुगंधित पुष्‍पहार देखणे
स्‍तुति स्‍तवने म्‍हणता भक्‍त रंगुनि जाती
अरुणोदय समयी भूतलि जणु ये भक्ति
अखंड नंदादिप उधळति प्रकाश सोन्‍याचा
आणि‍ सुगंध उदबत्‍यांचा
नेवैद्य समर्पुनि प्रेमे जगदंबेसी
मागणे मागु या दे तव दृढ भक्तिसी
 
दया करावी अंबे
दया करावी अंबे
मजसी लोटु नको जगदंबे ।
 
विलंब झाला आठविण्‍या तुज
 
तयार न कोणि स्‍वीकारण्‍या मज
कोण तुझयाविण अंबे
मजसी लोटु न‍को जगदंबे।
 
मोहमयी विश्‍वात सोडले
मायापाशी मज गुंतविले
मी पण मजसी न सोडि न सरले
क्षमा करी जगदंबे
मजसी लोटु नको जगदंबे।
 
बाल शैरावी तरल कल्‍पना
तरुणापणि धन मान अंगना
वृध्‍दपणी नच विवेक ज्ञाना
कळले हे परि फार विलंबे
मजसी लोटु नको जगदंबे।
 
पूजाअर्चा कधि नच केली
नामस्मरणि न गोडी धरली
प्रपंच व्‍याधी तनु ही थकली
मन करि व्‍यापक अंबे
मजसी पावन करि जगदंबे ।
मम जन्‍मदात्रिला जग दाखविले फिरूनि
मम जन्‍मदात्रिला जग दाखविले फिरूनि
तव अगाध लीला जगदंबे जगजननी ।
पुण्‍याई तिचि का? कृपाच तव तिजवरचि
जाणीव परी मज भारभूत हो साची
ऋणभार कृपेचा अश‍क्‍य जरि मज फिटणे
तरि जन्‍मभरि तुज कृतज्ञतेने स्‍मरणे
अंशत: तयाचि फेड कशि तरि व्हावी
शेरणी गुळाची राउळि मी वाटावी
योजिले असे जरि पूर्ण तूंच ना केले?
सोहळा तुळेचा मंदिर गजबजलेले
आनंद आगळा आसू दाटले नयनी
किं कृतज्ञता मम सरते अश्रुरुपानी
 
जगदंबे जगनजननी आई अंबिके
जगदंबे जगनजननी आई अंबिके
करुणामयि म्‍हणविसि तूं महाकालिके
सकल देव सोडुनि तव चरणि शरण मी
नको अव्‍हेरूस मीच कष्टी संभ्रमी
वय मम झाले गमते कठिण मन्‍मना
विधिवत तव पूजन मज ज्ञात मुळिच ना
जगदंबे स्‍तुतिस्‍तवने मजसि येती ना
सेवा नच होई करें पूजनेहि ना
रात्रदिन ध्‍यास तुझा लक्ष तव पदि
नको परतवुस मजसी ठाव दे पदी
जय अंबे जगदंबे न मंत्र या विना
जगतजननी तुजवाचुनि कणव ये कुणा?
 
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved