सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
आला संक्रांतिचा सण
आला संक्रांतिचा सण
शालु शेले ग नेसुन
दागदागिने लेऊन
आनंदाने जाऊया!
 
हाति घेऊनिया वाण
चला मंदिरि जाऊन
जगदंब दयाधन
पद कमली अर्पुया।
 
अष्‍टभुजा जगदंबा
हास्‍पमुखी दिसे अंबा
क्षणभरि इथे थांबा
मनि ध्‍यान करू ।
 
किति देखणे हे रुप
शिण जाई आपोआप
दूर करि भवताप
कामधेनुचही भक्‍ता ।
 
कुकूं हळदिची वाटी
खणा नारळाची ओटी
मंदिरात झालि दाटी
सुवासिनि जमल्‍या ।
 
गाऊ प्रेमे गुणगाथा
ठेऊ चरणि ग माया
साथ आशिर्वाद हात
मागु जन्‍मोजन्मि ।
 
हळदकुंकु देऊ घेऊ
वाण वाहु देऊ घेऊ
मनि प्रेमभाव ठेऊ
विसरूनि कटुता।
 
तिळ गुळ घ्‍या हलवा
गोड बोला व बोलवा
परस्‍परा प्रेमभावा
ठेऊ आजपासुनि।
 
जगदंब दयाधन
हळदिकुंकवाचि खुण
माझं अहे व लेण
ठेव जन्‍मथरि ।
बालपणिचा काल मजेचा नशिबी नव्‍हता लिहिला
बालपणिचा काल मजेचा नशिबी नव्‍हता लिहिला
दुखणाईत धरि वडील त्‍यांच्‍या सेवेतच बहु गेला
किशोर वयि मम छत्र हरवले पिता बंधु नच उरला
शिक्षणात हो खंड प्राणी हा उदरार्थी हो झाला
जरि होति बहु कला आवडी मुरड घातले छंदा
आनंदाला मुकलो झालो पैशाखातर बंदा
प्रपंच केला मायपि‍त्‍यांचा जाणिव कवणा होती?
कामापुरते गोड सर्वजण मनात माया नव्हती
हौस मौज ती विरून गेली कधीच झाला होम
खंत मात्र ही सदैव हृदयि कसे लोपले प्रेम?
गृहसौख्‍याबाबतीत खचितचि मीच अधिक भाग्‍यचा
कलम सुत दुहिता यांच्‍यासह काल जाई मौजेचा
सुन दुहिताचे यश परि जाई निसटुनि थोडया करि
असे सतत का व्‍हावे कारण  न कळे विचार करित
जवळचेच जर करू लागले मनातुनि दु:खास
प्रयत्‍न जरि मग कीतिक झाले फुकाच हो सायास
कर्ति करविती तूचं अंबिके तुलाच हित मम कळतेस
जगदंब जगजननी तुझ्याविन कुणास विनवु माते
आजवरी जे घडले सारे तूच असे घडवियले
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
   
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved