सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
जगदंब!  जगदीश्‍वरि तू जगजननी
जगदंब!  जगदीश्‍वरि तू जगजननी
अपार महिमा वर्णु शके कुणि ज्ञानी सुखर मुनि ।
 
असुरमदें सुरवर बहु भ्‍यालें
तव पायि नतमस्‍तक झाले
निर्दाकुनि त्‍वा असुर स‍हज ते
रक्षियले तत्‍क्षणी । जगदंब । जगदीश्‍वरी .........
 
रणरागीणि तुज म्‍हणति सुरेश्‍वर
झालिस महिषार्दिनि
कल्‍पतरुसम निजभक्‍ता
तू रक्षिसि रात्रदिन । जगदंब । जगदीश्‍वरी .........
 
ठाव तुझया पदि दे मज माते
माय कुलस्‍वामिनी
कणव तुझ्या‍विण येईल कोणा?
सांग मला स्‍वामिनी । जगदंब । जगदीश्‍वरी .........
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
टाळ मृदुंगाची साथ
टाळ मृदुंगाची साथ
वाजंत्रयाची ठेका त्‍यात
आरती आलि दारात
जय महाकाली गजरे ।।१।।
 
उदबत्‍तीचा सुगंध
येतसते मंद मंद
ज्ञानियाचा राजा येथ
बारवे समीप असे ।।२।।
 
सर्व गांव पीतो पाणी
बारव ही उपसोनी
ऋण याचे असे मनी
आरतीचा हा हेतु हो ।।३।।
 
पुढे आहे गणाधीश
आरतीस ये आवेश
हिलालाचा हो प्रकाश
मार्ग दावितसे सकळा ।।४।।
 
अश्‍वत्‍थाचा येथे पार
मुंजोबा हा नरहर
सार्मथ्‍याला नाही पार
आरती तयाची करु ।।५।।
 
हेमाडपंती मंदीर
येथ उभा म‍हेश्‍वर
पुढे आहे नंदीश्‍वर
आरतीस गर्दी लोटे ।।६।।
 
मधे आहे हो समाधी
सोडोनी सर्व उपाधी
कांकाजीना वडिलाआधी
मान देऊ या हो येथ ।।७।।
 
गर्जतसे उफ ढोल
सुरु लैजिमींचा ताल
नाचताती करूनि गोल
देहभान विसरांनी ।।८।।
 
टाळ मदुंग वाजंत्री
मधोमध पंचारती
विठठलाचे नामामृति
रंगताती भक्‍तजन ।।९।।
 
हळुहळु गर्दी दाटे
आप्‍त इष्‍ट मित्र भेटे
आरती छबिना वाटे
मारुती मंदिरी येई ।।१०।।
 
मारुतिची आरती होई
पुढे नाटकाची घाई
आजकाल भारुडाची
प्रथा बंद झाली असे ।।११।।
 
पुढे आरती दत्‍ताची
आणि विठठल मूर्तिची
मंदिरी परतण्‍याची
वेळ आली त्‍वरा करा ।।१२।।
 
“रंगशिळेवर नाचावे
सख्‍याहरीसी भेटावे“
एसे आनंदाने गावे
वाटेतूनी येता येता ।।१३।।
 
परतला हो छबिनी
झाली गाव प्रदक्षीणा
मंदीरातल्‍या त्‍या दोन्‍ही
अजुनि पूर्ण होणे असे ।।१४।।
 
ऐसा “नवरात्र सोहोळा“
छबिन्‍याची रात्रवेळा
प्रतिवर्षी चाललेला
देवीभोयरे गावात ।।१५।।
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved